रत्नागिरी:नियाझ खान
दि.१६ : येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले मक्तेदार मे. टेक निर्माण इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. रत्नागिरी यांच्याकडून माहे फेब्रुवारी २०२४ पासून प्रगतिपथावर आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
राज्य परिवहन मध्यवर्ती रत्नागिरी बसस्थानकाचे पुनःर्बांधणीचे काम रा.प. महामंडळामार्फत शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या निधीतून सुरू होते. पुर्वीच्या कंत्राटदारांकडून हे काम जोता पातळीपर्यंत करण्यात आलेले होते. परंतु, दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. करारनुसार रत्नागिरी बसस्थानक पुनःर्बांधणीचे उर्वरित काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले मक्तेदार मे. टेक निर्माण इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. रत्नागिरी यांच्याकडून माहे फेब्रुवारी २०२४ पासून प्रगतिपथावर आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.