श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमन पदी मा. श्री. सुभाष काडाप्पा तर व्हा. चेअरमन पदी मा. श्री. बाळासाहेब केटकाळे यांची बिनविरोध
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १७ नोव्हेंबर :इचलकरंजी येथील श्री आदिनाथ को ऑप बँक लि. इचलकरंजी या बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा सोमवार दि.१४.११.२०२२ रोजी मा. श्री. प्रेमवास राठोडसाहेब, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या प्रधान कार्यालयात संपन्न झाली. सदर सभेमध्ये मा. श्री. सुभाष आविशा काडाप्पा यांची चेअरमन पदी तर मा. श्री. बाळासाहेब कल्लाप्पा केटकाळे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. सभेमध्ये सभा अध्यक्ष मा. प्रेमदास राठोड तसेच बँकेचे नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करणेत आता व उपस्थित संचालकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तसेच निवडणुक अधिकारी यांनी बँकेस प्रशिक्षित व चांगले कर्मचारी असल्यास बँक उत्तम चालते आणि तसा कर्मचारी आपल्या बँकेकडे असलेचे नमूद केले. प्रक्रीयेत सर्वाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सुरुवातीस सभेचे अध्यक्ष व उपस्थित संचालकांची ओळख व स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जे. बी. चौगुले यांनी केले. बँकेच्या वाटचालीत सहकार महर्षि मा. खा. कल्लाप्पाणा आवाडे (बाबा) व लोकप्रिय आमदार प्रकाशरावजी आवाडे (आण्णा) यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच लाभले आहे. तसेच निवडणुक बिनविरोध करणेकामी युवा नेतृत्व मा. स्वप्नीलजी आवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सत्कार प्रसंगी मा. चेअरमनसो यांनी आपल्या मनोगतात बँकेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय आप्पासो मगदूम यांच्या स्मृतीस अभिवादन करून बँकेच्या सर्वागिण विकासासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ कटीबध्द असल्याची ग्वाही दिली. तसेच बँकेच्या नावलौकिकास कसल्याही प्रकारची बाधा निर्माण होईल अशाप्रकारचे काम संचालक मंडळाकडून होणार नाही. ज्या विश्वासाने बँकेच्या सभासदांनी विश्वास दर्शविला व निवडणुक बिनविरोध केली त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही दिली.तसेच मा. व्हा. चेअरमनसो यांनी आपली बँक सक्षम असून पुर्वी पासून गुणवत्ता पूर्ण कामकाज करते तसेच पुढील काळात ही करणार असलेची ग्वाही दिली. तसेच बिनविरोध निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले.
त्याचप्रमाणे शुभेच्छा प्रसंगी संचालक मा. मधुकर मणेरे यांनी मा. काडाप्पा सरांबरोबरचे आपले अनुभव कथन करून व मा.केटकाळे साहेबांच्या सामाजिक कामाची माहिती देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे श्री. बाळासाहेब पा. चौगुले यांनी बँकेच्या जुन्या काळातील अनुभव सांगुन संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांची आठवण करून शुभेच्छा व्यक्त केले. मा.राजू मगदूम यांनी बँक करीत असलेल्या गुणवत्तापुर्ण कामाचे कौतुक करून निवडीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
सदर सभेस बँकेचे नवनिर्वाचित संचालक बाळासाहेब पा.चौगुले, कुंतिलाल पाटणी, अभयकुमार मगदूम, चंद्रकांत मगदूम, मधुकर मणेरे, सुदर्शन खोत, श्रेणीक मगदूम, अनिल बम्मनावर, गुरुनाथ हेरवाडे, संपत कांबळे, सुकुमार पोते, संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जे. बी. चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.