शेडशाळ येथील 225 एकर क्षारपड जमीन सुधारणा कामाचा शुभारंभ

शिरोळ:प्रतिनिधी 

दि .३० शेडशाळ येथील दुसऱ्या टप्प्यातील 225 एकर जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत मुख्य पाईपलाईन सर्व्हे कामाचे उद्घाटन श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.अन्नदाता बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित शेडशाळ यांच्यावतीने सरळी शेती विभाग मुख्य पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले. पाण्याच्या निचरा न झाल्याने पिकाऊ जमीन नापीक व क्षारयुक्त होत असल्याने याठिकाणी सच्छिद्र करणे गरजेचे होते. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. आज या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी साहित्यिक डॉ. मोहन पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना, दत्तचे संचालक भैय्यासाहेब पाटील, रावसाहेब चौगुले- चेअरमन शेतकरी विकास सोसायटी, इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, पापा शहापुरे, गोपाल चौगुले, मनोज गडगे, संजय कोले, सचिन जगनाडे, भारत लाड, वसंत पवार, शिवमूर्ती देशींगे, संजय मगदूम, अर्जुन शहापुरे, महावीर तकडे, बापू तकडे, गौस पाथरवट, महावीर माणकापुरे, मयूर अकिवाटे, राजेंद्र चौगुले, जालिंदर सगरे, सत्याण्णा चौगुले, शामराव कांबळे, विष्णू गंगधर, सुरेश केरीपाळे, अशोक शिरढोणे, महेश तारदाळे आदी शेतकरी उपस्थित होते.
यानंतर शेडशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेती प्लॉटला गणपतराव पाटील व मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली तसेच त्यांच्या या कामाला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×