डी.के.टी.ई. च्या प्रा. सुजित सौंदत्तीकर यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी:कयुम शेख
दि . ११. येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत असणारे प्रा. सुजित अशोकराव सौंदत्तीकर यांना विश्वेश्वरया टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, बेळगांवी यांचेकडून पी.एच.डी. इन मेकॅनिकल इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे.
प्रा.सुजित सौंदत्तीकर हे गेली १८ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘डेव्हलपमेंट अँण्ड ऍनॅलिसीस ऑफ कंपोनंट हँडलिंग सिस्टीम युजिंग अर्टिफिशिएल इंटिलिजन्स अँण्ड मशिन लर्निंग ऍप्रोच’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनाअंतर्गत लो कॉस्ट ऍटोमेशन टेक्नॉलॉजीचा वापर मुख्यत: एस.एम.ई. मधील अनेकविध कंपोनंट हातळणीसाठी फलेक्झिबल कार्यप्रणाली स्वंयंचलित रोबोटच्या स्वरुपात विकसीत केली आहे. या संशोधनामुळे लहान व मध्यम उदयोगांना देखील ऍटोमेटिक मटेरिएल हँडलिंगच्या साहयाने इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञानात हातभार लावण्यास मदत होवू शकते. या संशोधनासाठी त्यांना डीकेटीईचे मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. आर. नाईक व के.एल.ई.चे . प्रा. डॉ. सी.व्ही.अडके यांचे मार्गदर्शन लाभले.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, डॉ. ए.बी. सौंदत्तीकर व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या प्र.संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. व्ही.आर. नाईक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.