डेक्कन प्रोसेस चेअरमनपदी बापूसाहेब तेरदाळे, व्हा.चेअरमनपदी राजेंद्र बचाटे

इचलकरंजी : विजय मको टे
दि .१७ नोव्हेंबर :येथील डेक्कन को-ऑप. टेक्स्टाईल प्रोसेसच्या चेअरमनपदी बापूसाहेब तेरदाळे आणि व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र बचाटे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी एफ. डी. मुजावर आणि अभिजीत बडवे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या नुतन संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
डेक्कन को-ऑप. टेक्स्टाईल प्रोसेसची निवडणूक नुकतीच मोठ्या चुरशीने पार पडली. त्यामध्ये कामगार नेते शामराव उर्फ अशोक कुलकर्णी, बापूसाहेब तेरदाळे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ सहकार महर्षी दत्ताजीराव कदम विचार पॅनेलने सर्व 13 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. या नुतन संचालक मंडळाची बैठक संस्था कार्यालयात पार पडली. त्यामध्ये चेअरमनपदी बापूसाहेब तेरदाळे आणि व्हा. चेअरमनपदी राजेंद्र बचाटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना चेअरमन बापूसाहेब तेरदाळे यांनी, सहकार महर्षी दत्ताजीराव कदम, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी ही संस्था उभी केल्याचे सांगत स्पर्धात्मक युगात सहकाराचा संदेश देण्याचे काम प्रामाणिकपणाने केल्याने यश मिळाल्याचे आवर्जुन सांगितले. नुतन व्हा. चेअरमन राजेंद्र बचाटे यांनी, महाराष्ट्रातील कापड व्यवसाय सध्या अडचणीत असून टेक्स्टाईल प्रोसेसिंग व्यवसायसुध्दा संकटातून मार्गक्रमण करीत आहे. अशा परिस्थितीत आम प्रकाशरावजी आवाडे यांच्या नेतृत्वाखाली बंद पडलेली डेक्कन प्रोसेस ही संस्था सुरु करून सहकार क्षेत्रात एक नवे पर्व केले आहे. जरी संस्थेची निवडणूक लागली तरी विधायक कामांच्या बळावर आपले पॅनेल विजयी झाले. आता या संस्थेला सर्वजण मिळून पुनश्‍च गतवैभव प्राप्त करुन देऊ अशी ग्वाही दिली.
निवडीनंतर नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा उद्योगपती सतिश डाळ्या,  विलास गाताडे, प्रकाश गौड, चंद्रकांत माने, भरत खडसारे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा युवा सचिव प्रमोद बचाटे, प्रकाश निकम आदी उपस्थित होते. निवडीनंतर नुतन पदाधिकार्‍यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी, कापड धंद्यातील नवनव्या योजना या संस्थेत आणण्याचा मानस व्यक्त करत आधुनिक मशिनरीने व नवीन व्यवस्थपनाने संस्थेचा विकास करूया असे सांगितले. यावेळी नूतन पदाधिकार्‍यांचा ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे आणि प्रकाश मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सभेचे नियोजन संस्थेचे कार्यकारी संचालक शामराव कुलकर्णी यांनी केले. यावेळी नूतन संचालक सौ. विजयालक्ष्मी कुलकर्णी, मन्सुर मुजावर, प्रदीप शाहू, अरुण शिंगे, भरत कुंभोजे, सुरेश धनवडे, संजय माणगांवे, डॉ. गिरीष कुलकर्णी उपस्थित होते. इंटक अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांनी आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×