प्रणिती शिंदेंच्या पराभवासाठी श्रीकांत शिंदेंची फिल्डिंग

सोलापूरमध्ये मुख्यमंत्र्याचे सुपुत्र अ‍ॅक्टिव्ह

सोलापूर:प्रतिनिधि

दि:१३:जून:शहाजीबापू पाटील यांच्याव्यतिरिक्त जिल्ह्यात आमदार नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेने सध्या सोलापूर जिल्ह्यात कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे अ‍ॅक्टिव्ह झाले असल्याची माहिती आहे. नुकतीच श्रीकांत शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर सोलापूरमधील जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये सोलापूरमधील सर्व 11 विधानसभा मतदारसंघावर पॉईंट टू पॉईंट चर्चा करण्यात आली असल्याची माहिती मिळतं आहे. यात खास करुन सोलापूर मध्यसाठी खास चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

नुकतीच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर सोलापूरसाठी खास बैठक पार पडली. यात जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांना बोलावून घेतले होते.यावेळी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत असल्याने ते उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या बैठकीचे नेतृत्व श्रीकांत शिंदे यांनी केले. यात त्यांनी सोलापूर मध्यसाठी विशेष चर्चा केली. इथून सध्या तरी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव चर्चेत आले आहे. शिवाजी सावंत हे स्वतः संपर्कप्रमुख असून त्यांनी मतदारसंघातील शिवसेनेच्या ताकदीबद्दल श्रीकांत शिंदे यांना माहिती दिली. नवा चेहरा आणि चांगले नेतृत्व दिले तर चित्र बदलू शकते असे सांगितले.

प्रा शिवाजी सावंत यांनी आतापर्यंत 2004, 2009 आणि 2014 अशा विधानसभांच्या तीन निवडणुका लढविल्या आहेत. मात्र यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. आता आगामी भाजप आणि शिवसेना युती म्हणून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अशात माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते जर भाजपमध्ये गेल्यास त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे भाजपकडून माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रा. शिवाजी सावंत यांनी आपला मोर्चा ‘शहर’मध्ये कडे वळवल्याचे दिसत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×