विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत मौजे बांधतिवरे व साकुर्डेत कृषी योजनांची माहिती
रत्नागिरी:नियाझ खान
दि.२५, विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत मौजे – बांधतिवरे व साकुर्डे येथे उपस्थित शेतक-यांना कृषीविषयक केंद्र व राज्य पुरस्कृत मुख्य योजना पी एम एफ एम ई, पी एम किसान, फळपीक विमा योजना, एम आय डी एच, पीएम के एस वाय, प्रधानमंत्री फसल विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण अभियान, माती नमुने काढणे, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, सेंद्रिय शेती, शेतकरी जनता अपघात विमा योजना आदी योजनेबाबत माहिती कृ.प. हर्णे यांनी दिली.
यावेळी बांधतिवरे सरपंच श्री. साळवी, ग्रा.प.सदस्य तसेच मौजे – साकुर्डे येथे माजी पं.स.सभापती उन्मेश राजे, सरपंच सचिन बैकर, पो.पा. श्री. बैकर, ग्रा.पं. सदस्य व इतर शासकीय विभागातील कर्मचारी वर्ग, तसेच यु.स.बंगाल, कृ.प. हर्णे, पी.एस.माने कृषी सहाय्यक उपस्थित होते.
माती नमुने का व कसे घ्यावेत याबाबतचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.