राजवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा – दुर्गामाता कोंडमळा संघ विजेता
संगमेश्वरनियाझ खान)
केदारनाथ क्रीडा मंडळ, राजवाडी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता कोंडमळा संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी दोस्ती-यारी, माळवाशी संघावर तीन गुणांनी विजय मिळवला.
*दोन दिवस रंगलेल्या स्पर्धेचा उत्साह*
ही स्पर्धा दोन दिवस चालली होती. उद्घाटनप्रसंगी जितेंद्र चव्हाण, वसंत उजगावकर, सतिश कामत, चंद्रकांत भडवळकर, नंदकुमार मांजरेकर, सुभाष मांजरेकर, सुभाष खांबे, नरेंद्र गुरव, अरविंद सुर्वे،पत्रकार दिपक तुळसणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना जितेंद्र चव्हाण यांनी कबड्डी सारख्या खेळांमुळे युवकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी असे मत व्यक्त केले. तसेच, मैदानी खेळ महत्त्वाचे असून, मोबाईलच्या आहारी जाऊ नये असा संदेश त्यांनी दिला. सतिश कामत यांनी खेळाडूंनी मेहनत घेऊन प्रो कबड्डी सारख्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करावी, असे सांगितले.
*तृतीय क्रमांक जय शंभू, कसबा संघाचा*
या स्पर्धेत जय शंभू, कसबा संघाने तृतीय स्थान पटकावले. स्पर्धेतील विविध पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत –
उत्कृष्ट चढाईपटू – प्रसाद करंडे
उत्कृष्ट पकड – ऋत्विक घाणेकर
सर्वोत्कृष्ट खेळाडू – मनीष खापरे
*मान्यवरांचा उपस्थितीत स्पर्धेचा यशस्वी समारोप*
या स्पर्धेला चंद्रकांत जाधव, संतोष जाधव, प्रमोद कडवईकर, केतन ओकटे, पांडुरंग सुर्वे, आकांक्षा सुर्वे, सुमित्रा मांजरेकर, बंड्या लिंगायत, प्रदीप भडवळकर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
स्पर्धेचे पंच म्हणून मंगेश खळे आणि ओंकार पातेरे यांनी भूमिका पार पाडली. सूत्रसंचालनाची जबाबदारी मिलिंद कडवईकर आणि संतोष कदम यांनी पार पाडली.
*स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तरुणांची मेहनत*
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक बाईत, योगेश मांजरेकर, सर्वेश सुर्वे, साहिल मांजरेकर, यश भडवळकर, आयुष भडवळकर, पारस बाईत, स्वस्तिक गुरव, दिप गुजर, हर्ष गुजर, शुभम गुरव, ओंकार मांजरेकर, सूरज भडवळकर, साईराज सुर्वे, सुमित सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.