विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेत जिल्ह्याचे काम चांगले
-सहसचिव संकेत भोंडवे
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि१५ : विकसित भारत संकल्प यात्रा या केंद्र शासनाच्या विशेषत: पंतप्रधान महोदयांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमात जिल्ह्याचे काम चांगले होत आहे, अशा शब्दात या मोहिमेचे प्रभारी अधिकारी तथा भारत सरकारचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी गौरव केला.सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे श्री. भोंडवे यांनी दोन्हीही जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मीन, जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय अभयसिंह शिंदे-इनामदार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. आराखडे लक्ष्य 265 ग्रामपंचायत संख्येपैकी 260 ग्रामपंचायतींमध्ये यात्रा पूर्ण झालेली आहे. यामध्ये 24 हजार 947 महिला,21 हजार 922 पुरुष असे एकूण 47 हजार 971 नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यात 1 हजार 102 अतिविशेष व्यक्तींचा देखील समावेश आहे. 512 लाभार्थ्यांची उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी करुन नवीन गॅस
जोडण्या दिल्या आहेत.सहसचिव श्री. भोंडवे यावेळी म्हणाले, या मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्या. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घ्या.पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन यामध्ये वेगळे काही जिल्ह्यासाठी करुन दाखवा, असेही ते म्हणाले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.