डीकेटीईचा जीतो इन्क्युबीएशन ऍण्ड इन्व्होऐशन यांचेशी उदयोजकता विकास वाढविण्यासाठी सामंजस्य करार

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी 

दि  ३०  ः डीकेटीईचे टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि जीतो इन्क्युबीएशन ऍण्ड इन्व्होएशन फौंडेशन यांचेशी, स्टार्टअप, नवीन उद्योजक तयार करणे त्यांना उद्योगक्षेत्रात सुसंधी प्राप्त करुन देणे व उदयोजगतेला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी कल्याणासाठी सामंजस्य करार झाला आहे.
इचलकरंजी येथील ना.बा.घोरपडे नाटयगृह येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात डीकेटीई चे पदाधिकारी व जीतो इन्क्युबीएशन ऍण्ड इन्व्होएशन फौंडेशनचे पदाधिकारी यांच्यात कराराचे आदानप्रदान झाले. या कार्यक्रमामध्ये डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे, प्र संचालिका प्रा. डॉ. सौ. एल.एस. अडमुठे व जीतो इन्क्युबीएशन ऍण्ड इन्व्होएशन फौंडेशनचे झोनल कनवेनअर संदीप पाटणी, यांच्यामध्ये कराराचे अदानप्रदान झाले. यावेळी जीतो इचलकरंजीचे चेअरमन अरुणकुमार लालवाणी, व्हा.चेअरमन जीतो, राजेंद्र पाटील, चेअरमन जीतो युथ विंग अंकीत मुथा, सचिव अभिषेक जैन  यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या उदयोजगीय कौशल्यांचा व महत्वकांक्षेचा उपयोग करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उददेशाने हा करार करण्यात आलेला आहे. या करारामुळे या परिसरातील स्टार्टअपस ना प्रोत्साहन देणे, ज्ञानाची देवाण घेवाण सुलभ करणे व त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे यासाठी दोन्ही संस्थेच्या माध्यमातून उदयोजकांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मदत होईल. उदयोगाची संकल्पना, उत्पादनाचा दर्जा, ग्राहकांची गरज, त्यातील वेगळेपण, उदयोग आराखडा, उत्पादनाची वैशिष्टये, बाजारपेठ, रोजगारनिर्मिती या सर्व बाबींचा या करारामध्ये विचार केलेला आहे. डीकेटीईच्या प्राध्यापकांच्याद्वारे उद्योग वाढीसाठी विविध विषयावर मार्गदर्शन मिळणार असून इचलकरंजी व आसपसाच्या उदयोगाचा विस्तार व गुणवत्ता वाढीसाठी देखील फायदा होणार आहे.
सदर करार संपन्न होण्यासाठी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.  या करारासाठी प्रा. डॉ. मंजुनाथ बुर्जी, प्रा.जी.सी.मेकलकी यांनी समन्वयकाचे काम पाहिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×