डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची बुटकॅम्प २०२४ स्पर्धेत चमकदार कामगिरी

इचलकरंजी:विजाय मकोटे 

दि  २३ ऑक्टोंबर – डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील मेकॅनिकल विभागातील दोन संघातील विद्यार्थी ‘सीटीसी‘ टीम कडून प्रथमेश कदम, तुषार धुळूबुळू तर ‘हाय फलायर्स‘ टीमकडून निकिता गदडे, मिस्बहा अत्तार, गायत्री चव्हाण व राजलक्ष्मी सपली यांनी एआयसीटीई, शिक्षण मंत्रालय व वाधवानी फौंडेशन यांच्याद्वारे एमजीएम विद्यापीठ, छ. संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या देशपातळीवरील पाच दिवसीय बुटकॅम्प स्पर्धेत सहभाग घेवून चमकदार कामगिरी केली याशिवाय तेथे विशाल नायर यांच्या डिझाईंनिंग थिंकींगच्या मूलभूत गोष्टींवरील डायनॅमिक सत्रात उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला. विद्यार्थ्यांनी प्रा. जी. सी. मेकळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उदयोजकता, नवकल्पना आणि डिझायनिंग थिंकीग‘ याचे सादरीकरण केले.
ही स्पर्धा छ. संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठ  येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये इन्व्होवेशन, डिझाईन आणि उदयोजकता या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील ९० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या पैकी सीटीसी सॅटेलाईट प्रोपल्शनची निवड सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय बिझनेस प्रेझन्टेंशन म्हणून करण्यात आली.
या बूट कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना शोधल्या, उदयोजकीय कौशल्यांचा सन्मान केला आणि समविचारी व्यक्तींशी विविध विषयांवर उहापोह करण्यात आला याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन करण्यास होणार असून या बुटकॅम्पमध्ये विशाल नायर यांच्या सत्रामध्ये नवोन्मेष आणि व्यवसाय रणनितींकडे सहभागीच्या दृष्टीकोनाला आकार देणा-या अनमोल अंतदृष्टी यांचे मार्गदशर्न मिळाले यामुळे भविष्यातील इन्व्होवेटीव्ह प्रोजेक्टसाठी या नविन धोरणांचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
डीकेटीई मध्ये उपलब्ध असलेली आयडिया लॅब, इन्व्होवेश कटटा तसेच डीकेटीईतील विविध अधुनिक लॅबमार्फत विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचे मार्गदर्शन केले जाते यामुळे अशा स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना या लॅबमधील सुविंधाचा लाभ होतो व देशापातळीवरील या स्पर्धेत आपली गुणवत्ता त्यांनी सिध्द केली.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ व्ही. आर. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×