डीकेटीईच्या मानसी महाजनला इंटेल कंपनीमध्ये २२ लाख पॅकेजवरती निवड
इचलकरंजी,: विजय मकोटे
दि . ३० ऑगस्टः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील इएनटीसी विभागातील मानसी महाजन या विद्यार्थींनीस इंटेल या मल्टिनॅशनल कंपनी कडून वार्षिक २२ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. डीकेटीईमधील तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त लॅब्ज व प्लेसमेंटसाठी आवश्यक असणारे पोषक शैक्षणिक वातावरण यामुळे इथे शिक्षण घेणारा विद्यार्थी कुशल अभियंता बनत आहे. या ही वर्षी डीकेटीईमध्ये १८ लाख, १७.५ लाख तर मागील वर्षी ४५ लाख २५ लाखचा व १८ लाखाच्या पॅकेजवरती विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यात निवड झाली आहे त्यामुळे अनेक मोठया पॅकेजच्या कंपन्यांचे लक्ष डीकेटीई संस्था वेधून घेत आहे. डीकेटीईमध्ये नोकरीच्या संधीबरोबरच विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी इनोवेशन व इन्क्युबीएशन सेल कडून मार्गदर्शन केले जाते.
अधुनिक स्टोरेजसाठी महत्वपूर्ण असलेल्या नँण्ड फलॅश मेमरीमध्ये इंटेल ही कंपनी अग्रेसर आहे. कंपनीचे क्वांटम कॉम्प्युटींग आणि न्यूरोमॉर्फिक कंम्प्युटयुंगमधील संशोधन तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देत आहे. इंटेलची इंटेल इनसाईड विपणन मोहिम १९९० च्या दशकात लॉंच झाली आहे वैयक्तीक संगणनामध्ये प्रोसेसरच्या भूमिकेवर जोर देणारी इंटेल कंपनी प्रतिष्ठित बनली आहे.
मानसी ची आंतरराष्ट्रीय स्तरावर २२ लाखावर झालेली निवड म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज देणा-या अघाडीच्या संस्थाबरोबर डीकेटीई भारतामधील सर्वोत्तम संस्था म्हणून गणली जात आहे याचा इचलकरंजी व डीकेटीईन्सना अभिमान आहे अशी प्रतिक्रीया संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांनी व्यक्त केली. मानसीच्या या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,व्हाईस चेअरमन व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ एस.ए. पाटील, टीपीओ प्रा. जी.एस.जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.