संगमेश्वरातील तरुणांकडून घरगुती गणेशोत्सव सजावटीचा आकर्षक देखावा सादर

 

संगमेश्वर:(दिनेश आंब्रे)

नावडी येथील युवा कार्यकर्ता साहिल सुनिल आंबवकर (Msc) याने गेले तीन वर्ष घरगुती गणेशोत्सव सजावटीमध्ये विविध आकर्षक देखावे साकारलेले आहेत.

 

सन २०२२ मध्ये गणेशोत्सवमध्ये त्याने विठाई बस त्यानंतर सन २०२३ मध्ये जेजुरी मंदिर अशी सजावट केली होती. यंदाच्या वर्षी आपल्या महान भारत देशाला T-20 वर्ल्डकप मिळाला असल्यामुळे साहिल आंबवकर याने आपल्या महान भारत देशाचा अभिमान मनाशी बाळगून तसेच राष्ट्रीय खेळाडूंची मेहनत व खेळाबद्दलचे प्रेम या दुहेरी संगमाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून या संगमेश्वरच्या युवा कार्यकर्त्याने आपल्या शिक्षणाबरोबर हि कला जोपासली आहे. यंदा अमेरिकेतील बार्बाडॉस स्टेडियम त्याने आकर्षित पद्धतीने व विविध कल्पकतेने साकारलेले आहे.

आई सोनम आंबवकर , वडील सुनिल आंबवकर व बहीण श्वेताली आंबवकर यांच्याशी संवाद साधून व त्यांचे सहकार्य मिळवून त्याने या देखाव्याच्या निमित्ताने मेहनत घेऊन हा देखावा साकारला आहे व देशाचा अभिमान राखण्याचा प्रयत्न केला आहे.संगमेश्वर मधील पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×