राज्यात भाजपाची सत्ता स्थापन इचलकरंजी शहरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

इचलकरंजी : संजय आंबे

   दि. ३ जुलै :  राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने इचलकरंजी शहरात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जल्लोष करून आनंदोत्सोव साजरा करण्यात आला.

                    यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी राज्यात असलेले वसुली सरकार, भ्रष्ट सरकारला पायउतार करायला लावले ते फक्त मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाले. भारतीय जनता पार्टीचे ११२ आमदार असतानाही त्यागाची भावना दाखवली. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी एका शिव सैनिकाला मुख्यमंत्री केले होते. तोच धागा पकडून बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वता: मुख्यमंत्री न होता शिवसेनेचे ४० आमदारांचे संख्याबळ असलेले आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले. व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या समोर एक आदर्श ठेवला कि सत्ता सर्वपरी नाही. सत्तेसाठी कधीही लाचारी पत्करली नाही हा संदेश दिला. शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले असून सत्ता परिवर्तन झाले आहे. या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य लोकांचा केंद्रबिंदू मानून राज्यकारभार भारतीय जनता पार्टी करणार आहे. असे आपल्या भाषणात म्हणाले.

                    यावेळी भारतीय जनता पार्टीने शहर कार्यालय येथून रॅली काढून, जनता चौके येथे साखर पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सोव साजरा केला. यावेळी “भारतमात की जय, राज्य का नेता कैसा हो देवेंद्र जेसा हो, अभी तो यह झांकी है, इचलकरंजी महानगरपालिका अभी बाकी है” आदि घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. महानगरपालिकेत भाजपचा प्रथम महापौर करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी केला.

                    यावेळी अरविंद शर्मा, उत्तमसिंग चव्हाण, अरुण कुंभार, धोंडीराम जावळे, सतीश पंडित, प्रवीण पाटील, किसन शिंदे, भरत जोशी, सौ.अश्विनी कुबडगे, सौ.नीता भोसले, सौ. योगिता दाभोळे, मुधुमती तोरगुले, सौ.अनिता कुरणे, सचिन मासाळ, बाबासाहेब कोरे, राजकुमार भाकरे, म्हाळसाकांत कवडे, सचिन पवार, अरविंद चौगले, दीपक रावळ, मनोज तराळ, हेमंत वरुटे, सागर कचरे, अमित जावळे, प्रितम बोरा, बाळकृष्ण तोतला, उमाकांत दाभोळे, शुभम बरगे, राजेश रजपूत, सलीम शिकलगार, सुधाकर शेंडगे, शंकर झित्रे, बाबासाहेब गाडे, प्रवीण रावळ, दौलत पाटील, प्रशांत काळे, शिवानंद रावळ, वैभव शेट्टी, प्रदीप कांबळे, अर्जुन सुतार, किशोर रायकर, आनंद पारिक, सचिन माळी, अतुल पळसुले, दीपक तेलवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×