ठाणे:प्रतिनिधि
दि:०१:ऑगस्ट: ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे माफ करावे
माजी महापौर नरेश मस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देत मागणी केली आहे
गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही उत्सवाबरोबरच समाजोपयोगी उपक्रमही राबवित असतात. गणेशोत्सवाची परंपरा टिकून रहावी यासाठी मंडळाचे कार्यकर्ते हे आपली नोकरी सांभाळून उत्सव साजरे करत असतात आणि अशा उत्सवातूनच कार्यकर्ते घडत असतात.
यंदा ठाणे महानगरपालिका मंडळांकडून मंडप भाडे आकारणार असल्याचे समजले. या पार्श्वभूमीवर मंडळांना दिलासा मिळावा यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप भाडे माफ करावे असे लेखी पत्र आज माजी महापौर नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले. याबाबत आयुक्त महोदय सकारात्मक निर्णय घेवून निश्चितच मंडळांना दिलासा देतील व यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी आशा आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.