प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन बंडखोर कवी काळाच्या पडद्याआड

लखनऊ:प्रतिनिधी

दि:१५: जानेवारी: प्रसिद्ध शायर आणि कवी मुन्नवर राणा यांचं लखनऊ या ठिकाणी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. ९ जानेवारीला त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. मुन्नवर राणा यांना किडनी आणि हृदयासंबंधीचे विकार जडले होते.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुन्नवर राणा यांची मुलगी सुमैया यांनी सांगितलं की रविवारी रात्री उशिरा वडील मुन्नवर राणा यांचं निधन झालं. आज (सोमवार) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुन्नवर राणा यांच्यानंतर त्यांची पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असं कुटुंब आहे. राणा यांच्या मुलाने सांगितलं की आजारी झाल्याने मुन्नवर राणा यांना १४ ते १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आधी मेदांता रुग्णालयात आणि त्यानंतर त्यांना एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मागच्या वर्षीही मुन्नवर राणा यांची प्रकृती बिघडली होती. लखनऊच्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डायलिसिस सुरु असताना त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यातून ते बरे झाले. मात्र रविवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

योगींबाबत काय म्हणाले होते राणा?

मुन्नवर राणा यांना बंडखोर शायर म्हणून ओळखलं जात होतं. वाद आणि त्यांचं गहीरं नातं होतं. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होण्याआधी मुन्नवर राणा म्हणाले होते की योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेशात राहणार नाही. या सरकारच्या मनात आलं तर मुस्लिमांना राज्य सोडायला लावतील असंही मुन्नवर राणा म्हणाले होते. २०२० मध्ये एका व्यंगचित्रावरुन वाद झाला आणि फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या झाली. ही कृती योग्य असल्याचंही राणा म्हणाले होते.

बंडखोर कवी अशीच ओळख

मुन्नवर राणा हे प्रसिद्ध शायर आणि कवी होते. उर्दू, हिंदी आणि अवधी भाषांमध्ये ते लिखाण करत असत. त्यांच्या या शैलीतल्या खास गझल आजही लोकांच्या स्मरणात आहेत. उर्दू साहित्यातल्या योगदानासाठी २०१४ मध्ये ्तयांना साहित्य अकदामी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तसंच २०१२ मध्ये त्यांना माटी रतन सन्मान देऊनही गौरवण्यात आलं होतं. २०१५ मध्ये त्यांनी देशातल्या असहिष्णुतेचा मुद्दा मांडून साहित्य अकदामी पुरस्कार परत केला होता. एवढंच नाही तर यानंतर आपण कुठलाही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही अशीही प्रतिज्ञा त्यांनी केली होती.

मुनव्वर राणा यांची शायरी लोकप्रिय

किसी को घर मिला हिस्से में, किसी के हिस्से में दुकान आई, मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में मां आई…”

 

“अभी ज़िंदा है माँ मेरी मुझे कुछ भी नहीं होगा, मैं घर से जब निकलता हूँ दुआ भी साथ चलती है

!इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है मां बहुत गुस्से में होती है तो रो देती है”

 

“जिस्म पर मिट्टी मलेंगे पाक हो जायेंगे हम एै ज़मीं एक दिन तेरी ख़ूराक हो जायेंगे हम”

 

“हमसे मोहबत करने वाले रोते ही रह जाएंगे हम जो किसी दिन सोए ,तो सोते ही रह जाएंगे”

 

“हम नहीं थे तो क्या कमी थी यहाँ ,हम न होंगे तो क्या कमी होगी”

 

“सरफिरे लोग हमें दुश्मन-ए-जाँ कहते हैं,हम जो इस मुल्क की मिट्टी को भी माँ कहते हैं !”

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×