दत्त उद्योग समुह,शिरोळ व ग्रामपंचायत शिवनाक वाडी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न

शिरोळ:राम आवळे 

 दि.२५:श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ व दत्त उद्योग समुहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतरावदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राच्या वतीने शिवनाकवाडी (तालुका शिरोळ) येथे नुकत्याच झालेल्या विषबाधा, त्याचे दुष्परिणाम – अशक्तपणा यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांची ग्रामपंचायत शिवनाकवाडीच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आले.


श्री दत्त साखर कारखाना व्यवस्थापन नेहमीच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन महापूर, दुष्काळ, कोरोना सारख्या संकटात मदतीचा हात पुढे करून सहकार्य करत असते. शिरोळ तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार व माजी आमदार स्व. डॉ. सा. रे. पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने उद्यानपंडित गणपतराव पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली व श्री दत्त आरोग्य केंद्राचे प्र. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली इनचार्ज सिस्टर भाग्यश्री भोसले, फार्मासिस्ट माधुरी कांबळे व ॲम्बुलन्स ड्रायव्हर प्रकाश कोळी यांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांचे रक्तदाब, नाडी परीक्षण, ऑक्सिजन प्रमाण, गरजेनुसार रक्तातील साखर पातळी तपासून योग्य औषधोपचार केले.९४  हुन अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायत शिवनाकवाडीच्या सरपंच सौ. सरिता खोत, उपसरपंच सौ. दीपाली भिलवडे, ग्रामविकास अधिकारी विजय कोळी, ग्रामपंचायत सदस्या वत्सला हांडे, लक्ष्मी आरगे, सदस्य सुरेश चेंडगे, क्लार्क राजेंद्र खोत व कर्मचारी व युवा कार्यकर्ते यांनी आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेतले व ग्रामपंचायतच्या वतीने श्री दत्त आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकातील सदस्यांचा शाल, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
22:59