कै. नितीन जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त नितीनोत्सव अंतर्गत मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
इचलकरंजी –हबीब शेख दर्जी
दि .१० एप्रिल २०२५ : युवा नेते, इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कै. नितीन अशोकराव जांभळे यांचा १० एप्रिल रोजी साजरा होणारा वाढदिवस यंदा नितीनोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने गुरुवार १० एप्रिल आणि शुक‘वार ११ एप्रिल रोजी नितीन जांभळे फौंडेशन व राष्ट्रवादी काँग‘ेस पार्टी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नितीन जांभळे फौंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या शिबीरात प्रामुख्याने रक्तदान शिबीर, स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीवी लसीकरण, महाआरोग्य शिबीर, वृक्षारोपण आदी कार्यक‘म होणार आहेत. दोन्ही दिवशी हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत अशोका हायस्कुल गणेशनगर याठिकाणी होणार आहे. गुरुवार १० एप्रिल रोजी एम.एस.आय. ब्लड बँक सांगली यांच्या सौजन्याने रक्तदान शिबीर आणि हसन मुश्रीफ फौंडेशन कागल यांच्या सौजन्याने ९ ते २६ वर्षे वयोगटातील मुलींसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. तर शुक्रवार ११ एप्रिल रोजी सेवासदन निरामय हॉस्पिटल व लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात एचबीसीबीसी, शुगर, कॅल्शियम, थायरॉईडस कि‘एटिनिन व एचआयव्ही आदी चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. त्यानंतर आवश्यकता भासल्यास तज्ञ डॉक्टरांकडून पुढील उपचार शासकीय योजनांमधून फौंडेशनच्या वतीने केले जाणार आहेत. त्याचबरोबर स्त्री रोग तज्ञ, हृदयविकार, बालरोग तज्ञांद्वारे तपासणी केली जाणार आहे. शिवाय मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. शहर आणि परिसरातील रुग्ण आणि नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेत नितीनोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन फौंडेशनच्या वतीने सुहास जांभळे यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.