गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध
कोल्हापूरःप्रतिनिधी
दि २६ कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दुध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणार्या गाडीचे पूजन गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर कोल्हापूर येथे करण्यात आले व त्यानंतर गाडी सौंदत्ती येथे रवाना करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा २२ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ इ. रोजी होत असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात यामध्ये कोल्हापूर मधून जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. सौंदत्ती येथे,यात्रा काळात पूजाअर्चा, चहा पाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्यनेमाचे कार्यक्रम होत असतात. यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी ही गोकुळमार्फत यात्रेकरूंची सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, अशोक पुणेकर,संतोष पाटील,श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष किरण मोरे, सुरेश बिरबोळे, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर,विजय पाटील, उदय पाटील,बाबुराव पाटील, सुनिल मोहिते,प्रदीप साळोखे, अच्युतराव साळोखे, मोहन साळोखे, चव्हाण, सरनाईक सेवा संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.