बारावी सायन्स उत्तीर्ण पीसीबी (बॉयोलॉजी ग्रुप) विद्यार्थ्यांस टेक्स्टाईल इंजिनिअरींग करण्याची सुवर्णसंधी

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि १६ जुलैः बारावीमध्ये पीसीबी घेवून व पीसीबी ची सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुध्दा इंजिनिअरींग प्रवेशाची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रथम वर्ष बी.टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्री व बी. टेक. फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेता येवू शकतो.
बारावी सायन्स मधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी विषय घेवून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डीकेटीईच्या प्रथम वर्ष बी.टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्री आणि बी. टेक. फॅशन टेक्नॉलॉजी या कोर्सेसना प्रवेश मिळणार आहे. या कोर्सेसना प्रवेश मिळाल्यावर शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरीता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी (डिग्री) अभ्यासक्रमात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन व कन्फर्ममेशन फॉर्म भरणेची मोफत सुविधा दि. १४ ते २५/०७/२०२४ अखेर आमच्या महाविद्यालयात उपलब्ध केली आहे.
‘बी.टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्री व बी.टेक. फॅशन टेक्नॉलॉजी ’ या कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस प्रोसेसिंग, मर्चटायझिंग, कलरमधील बारकावे, तसेच कटींग, स्टिचींग, पॅटर्न मेकींग, ड्रेस डिझायनिंग, गारमेंट कन्स्ट्रक्शन, एम्ब्रॉयडरी टेक्निक्स, कॅड, कॅम सारखे डिझायनिंग सॉफटवेअर्स इत्यादीचे विस्तृत ज्ञान अवगत होईल. गेली ४० वर्षे डीकेटीईमध्ये टेक्स्टाईलमध्ये दर्जेदार व उच्च पॅकेजवरती १०० टक्के प्लेसमेंट होत आहेत.  या बी.टेक. टेक्स्टाईल अभ्यासक्रमाचा १२ वी पीसीबी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.वाय.एम.इंडी ९८२२८६६०६५ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन डीकेटीई इन्स्टिटयूटचे प्र.संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×