इचलकरंजी बुधवारी व गुरुवारी मराठी बालनाट्य स्पर्धा
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. २ येथील अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन उपक्रम आणि माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ३ आणि ४ जानेवारी २०२४ या कालावधीत रोज दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत १५ संघ सहभागी झाले आहेत.
बुधवारी ३ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजता स्पर्धेचे उदघाटन होणार असून त्यानंतर लागलीच बालनाट्य सादरीकरणास सुरुवात होईल. यावेळी प्रज्ञान वारणानगर वारणा या संघाचे ताऱ्यांना लागले ग्रहण, न्यू हायस्कूल इचलकरंजी या संघाचे याला जबाबदार कोण, सप्तरंग सहयोगी कला मंच व आदर्श विद्यालय मिरज यांचे अभ्यासाचा वग, गायन समाज देवल क्लब कोल्हापूर यांचे राखेतून उडाला मोर, इचलकरंजी हायस्कूल नारायण मळा डी के टी ई यांचे हलगी सम्राट आणि शेवटी रोजरी हायस्कूल आजरा यांचे अमन ही बालनाट्ये सादर करण्यात येतील.
गुरुवार दिनांक ४ जानेवारी रोजी गडहिंग्लज कला अकादमी गडहिंग्लज निर्मित प्रायश्चित्त, शिंदे अँकॅडमी कोल्हापूर यांचे अस्तित्व, इंद्रधनु कलाविष्कार मिरज प्रस्तुत ईररिव्हर्सिबल, आजरा हायस्कूल आजरा यांचे झाडवाली झुंबी, पंडित दीनदयाळ हायस्कूल आजरा यांचे सिकंदर, बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे (आजरा) यांचे शहीद, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगावचे बिन कपड्याचा राजा, आदर्श गुरुकुल विद्यालय पेठवडगावचे अभ्यासाचा वग आणि ग्रीन व्हॅली प्रायमरी स्कूल पेठ वडगावचे एप्रिल फूल ही बालनाट्ये सादर होणार आहेत. याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
सदरच्या स्पर्धेसाठी पुणे व कोल्हापूर येथील मान्यवर रंगकर्मी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदरची स्पर्धा पाहण्यासाठी सर्वांना प्रवेश खुला असून विद्यार्थी आणि रसिक नागरिकांनी बाल कलाकारांच्या नाट्याविष्काराचा आस्वाद घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जरूर यावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष डॉक्टर एस पी मर्दा यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.