लोकसहभागातून आणि शहरातील आर्टिस्ट,कला महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या सहकार्याने इचलकरंजी शहराचे सुशोभीकरण करणार:-
आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे
इचलकरंजी:विजय मकोटे
दि १५:आपली इचलकरंजी ‘स्वच्छ इचलकरंजी सुंदर इचलकरंजी’ हे ध्येय मनात ठेऊन महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी लोकसहभागातून शहराचे सुशोभीकरण करणेचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने आज गुरुवार दिनांक १४ डिसेंबर रोजी उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी,सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी शहर आणि परिसरातील कला महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, खाजगी शाळांचे कला शिक्षक आणि शहरातील आर्टिस्ट यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते.सदर बैठकीत या विषयावर सविस्तर प्राथमिक चर्चा करणेत आली.
शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आणि शहरातील बॅंकेच्या सी.एस.आर. फंडातुन महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारती तसेच इमारतीच्या कंपौडच्या भिंती, खाजगी संस्थांच्या इमारती यावर स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अंतर्गत चित्रे, तसेच त्या इमारतीच्या परिसरास अनुसरून सामाजिक संदेश,तसेच शाळेच्या परिसरात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील असे रंगकाम करणेत येणार आहे. त्याचबरोबर याच अनुषंगाने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, कला महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच या क्षेत्रात काम करणारे हौसी कलाकार अशा वेगवेगळ्या गटांत स्पर्धेचे आयोजन सुद्धा करणेत येणार आहे. जेणेकरून आपली इचलकरंजी स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल.या बैठकीस शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांचेसह राकेश दडनवर, दत्तात्रय गोईलकर ,विश्वास पाटील,महेश निंबाळकर, ओंकार शिरगुपे, गजानन ढोणे,शुभम चव्हाण,राजन लोहार,संदीप कुंभार, सोमनाथ जाधवस्वप्नील मिठारी,अमोल सोनटक्केसिद्राम पोवार, दिलीप कांबळेशांतीनाथ जगताप आदी शहर आणि परिसरातील आर्टिस्ट उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.