इचलकरंजीत बेसिक वॉकेथॉन आणि जीवन संजीवनी प्रक्रिया अभियान उपक्रम संपन्न

3500 हजार नागरिकांनी घेतला सहभाग

इचलकरंजी :हबीब शैख 

दि ३० :अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिना निमित्त वॉकेथॉन आणि जीवन संजीवनी प्रक्रिया म्हणजेच (बी एल एस) बेसिक लाइफ सपोर्ट व स्वच्छता ही सेवा अभियान हा उपक्रम येथील राजाराम स्टेडियम येथे राबवण्यात आला .यावेळी  अलायन्स हॉस्पिटल चे कर्मचारी ,अधिकारी ,डॉक्टर व इचलकरंजी महानगरपालिकाचे आयुक्त उपआयुक्त व अधिकारी वर्ग व  जी पी असोसिएशन, माई असोसिएशन, रोटरी क्लब, आय एम फिट क्लब एस आय टी कॉलेज, नर्सिंग कॉलेज जयसिंगपूर चे प्रमुख व नागरिक उपस्थीत होते .यावेळी .हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित जोशी व डॉक्टर अमोल भोरे सर यांनी जीवन संजीवनी चे ट्रेनिंग दिले 

जागतील  हृदय  दिनाचे औचित्य साधत अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकेथॉन आणि जीवन संजीवनी प्रक्रिया बेसिक लाइफ सपोर्ट व स्वच्छता ही सेवा अभियान च्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .याचा  ३,५०० नागरिकांनी  ह्याचा  फायदा घेतला .  कार्यक्रमाचे उद्घाटन अलायन्स हॉस्पिटलची सर्व डायरेक्टर बॉडी व इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक व उपायुक्त यांच्या हस्ते झाले. त्या नंतर  आजच्या वाढत्या धगधगीच्या काळात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे, हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंट आपण घरातून हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाईपर्यंत मरन पावतात , असे पेशंट आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या अगोदर सुद्धा वाचवू शकतो या बाबत माहिती देवून  ट्रेनिंग देण्यात आले.  याबरोबरच झुंबा डान्स व वॉर्मअप  ट्रेनिंग  घेण्यात आले

त्यानंतर  अलायन्स हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर व आयुक्त आणि उपायुक्त यांच्या हस्ते झेंडा दाखवून ५  किलोमीटर ३ किलोमीटर व २  किलोमीटर वॉकेथॉनला सुरुवात झाली याबरोबरच मनोरंजनाचे व सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य व इतिहासकालीन मर्दानी खेळ यांचे सुद्धा प्रात्यक्षिक तिथे दाखवण्यात आले. जीवन संजीवनी क्रिया हा जीवन संजीवनी क्रिया हा पाठ्यक्रमाचा भाग करून घेणे बाबत मा. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य व शिक्षण विभाग यांना खासदार धैर्यशील माने  यांना सर्व इचलकरंजी शहर मार्फत अलायन्स हॉस्पिटल सीईओ आयेशा राऊत यांचे कडून निवेदन  देण्यात आले. इचलकरंजी मधील सर्व मंडळांनी सहभागी होऊन सदर उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×