मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा,‌ वेदनांची मांडणी व्हावी

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान‌ या विषयावरील परिसंवादात आशावाद

जळगाव:प्रतिनिधी

दि. २ : साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्यघटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केले आहेत. असे असताना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे चित्रण दिसून येत नाही. तसेच तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळत नाहीत. तेव्हा मराठी साहित्यिक व लेखकांनी तृतीयपंथीयपारलिंगी समुदायाच्या दु:खव्यथावेदनासमस्या जाणून घेऊन साहित्यात चित्रण करावे. असा आशावाद तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान‘ या विषयावरील परिसंवादात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केला.

            भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात एलजीबीटीआयक्यू समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्वीअर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरेतृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटीलविजया वसावेपुनीत गौडाडैनियल्ला मॅक्डोन्सा आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे सहभागी झाले.

            मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले कीलोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत तृतीयपंथीय समुदायाचे स्थान जसे महत्त्वपूर्ण आहे, तसे मराठी साहित्यातही तृतीयपंथीय समुदायाचे वास्तववादी चित्रण झाले आहे.

            श्री. खिरे म्हणाले कीतृतीयपंथीय समुदायाचे साहित्यातील व समाजातील स्थान समजून घेतांना लिंगलिंगभाव व लैंगिकता ह्या शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत.  पुनित गौडा म्हणाले कीपारलिंग पुरुष जन्माने स्त्री असतो. मात्र, मनाने तो पुरुष असतो. त्यांचे मन पुरुषाप्रमाणे घडत असते. डैनियल मॅक्डोन्सा म्हणाल्या कीमाणसाला माणसाप्रमाणे वागविण्यासाठी धर्माची गरज पडत नाही. तृतीयपंथीय व्यक्तींचे मन समाजाने समजून घेतले पाहिजेत.  

          शमिभा पाटील म्हणाल्या कीपारलिंगी समुदायाचे साहित्यात चित्रण जास्त झाले नाही. अण्णाभाऊ साठे यांच्यानंतर अनेक वर्षांचा कालखंडात लिखाण झाले नाही. स्वाती चांदोरकरदिशा पिंकी शेखलक्ष्मीपारूमदन नाईकनागा किन्नरी यांनी पारलिंगी समुदायाचे चित्रण त्यांच्या पुस्तके व कवितांतून मांडले आहे.तृतीयपंथीय समुदायाची स्वतःची भाषा असते. तृतीयपंथी समाज आता समाज माध्यमातून लिहायला लागला आहे. साहित्य विश्वाने आमच्या जगण्याचे प्रश्न मांडले पाहिजेत, अशी अपेक्षाही शमिभा पाटील यांनी व्यक्त केली.  विजया वसावे यांनी वनरक्षक भरतीत त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले.                     

           निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतोपण लोकशाही शासन व्यवस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून ती रसरशीत होणेही तितकेच महत्त्वाचे असते. या अनुषंगाने मराठी साहित्यात तृतीयपंथी समुदायाचे चित्रण झाले आहे काते कशा प्रकारे केले गेले आहेते करतांना लोकशाहीसांविधानिक मुल्यांचे प्रतिबिंब उमटले आहे कात्यांच्यापर्यंत लोकशाही पोहोचली आहे काती पोहोचण्यासाठी काय करता येईलअशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंवादात करण्यात आली. मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रा. डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×