सोनगिरी पंडित वाडीच्या रस्त्याचे अण्णा सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
सोनगिरी पंडित वाडीच्या रस्त्याचे अण्णा सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी:
पालकमंत्री उदय सामंत आणि भावी खासदार किरण सामंत यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षाची सोनगिरी पंडितवाडीच्या रस्त्याची मागणी पूर्ण झाली असून आज उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते सोनगिरी पंडितवाडीच्या रस्त्याचे उदघाटन फीत कापून करण्यात आले.
गेली अनेक वर्षे सोनगिरी ग्रामस्थ या रस्त्याचा पाठपुरावा करत होती. निधीच्या आणि जागेच्या अभावी रस्त्याचे काम होत नव्हते मात्र वाडीतील सर्व लोकांनी एकत्र येत पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याशी संपर्क करून या रस्त्याची मागणी केली. पालकमंत्री उदय सामंत यांनी रस्त्याचे काम करून देतो असा शब्द दिला फक्त शब्द दिला नाही दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आणि त्याच रस्त्याचे आज उदघाटन करण्यात आले. सोनगिरी पंडितवाडी गणेश मंडळाच्या कार्यक्रमाला अण्णा सामंत यांनी भेट दिली यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, आम्ही सामंत जो शब्द देतो तो पूर्णच करतो ही आमची परंपरा कायम आहे. आज संपूर्ण सोनगिरी गाव आमच्या पाठी मागे उभा आहे. माझ्या उदयला आपण प्रत्येक निवडूणुकीत भरभरून मतदान करताच ते उपकार मी फेडू शकत नाही मात्र तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या किरणला लोकसभेचे तिकीट मिळाले तर सर्वांनी त्यांच्या मागे उभे राहुन त्याला विजय करून दिल्लीत पाठवन्याचे भावनिक आहवान अण्णा सामंत यांनी केले.पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या माध्यमातून सोनगिरी पंडीत वाडीचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमानंतर अण्णा सामंत यांनी सोनगिरी तेलीवाडी येथील गणेश मंडळाला भेट देत गणरायाचे आशीर्वाद घेतले.त्याचप्रमाणे परचुरी येथील परशुराम वेल्ये यांच्या मंडळाला भेट देत गणरायाचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन ते म्हणाले कुणासाठी कुणाचे दरवाजे उघडे असतील की नसतील हे माहित नाही मात्र तुमच्या कुटुंबातील या सामंत परिवाराचे दरवाजे २४ तास तुमच्या साठी उघडे असतील. तुमच्या सुख दुःखात सामंत परिवारा मधील तुम्ही सदस्य म्हणून आम्ही तुमच्या खादयाला खांदा लावून उभे राहू.
या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुका प्रमुख बाबू म्हाप,पालकमंत्रीचे स्वीय्य सहाय्यक नेताजी पाटील,उपतालुका प्रमुख जमूरत अलजी,उपविभाग प्रमुख अतिश पाटणे, कोळंबे माजी सरपंच रघुनाथ पडवळ,मा.उपसरपंच चंद्रकांत भरनकर,अमोल पाटणे,प्रश्नांत मुळे,गौसु कापडे,तैमूर अलजी,रमेश पंडित,विलास पंडितदत्तात्रय खातू,दिनेश पंडित,यासिन संनगे,कासम मयेर,सचिन खातू तसेच सोनगिरी पंडित वाडीचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच परचुरी येथे माजी उपसभापती परशुराम वेल्ये,दीपक लिंगायत सरपंच शर्वरी वेल्ये तसेच परचुरी वेल्ये वाडीतील बहुसंख्य पदाधिकरी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.