जिल्ह्यातील 8 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र,प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन

 

रत्नागिरी, दि. १४ : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून  राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र ची स्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 8 महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमधून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लांजा येथील आर्टस्, कॉमर्स सायन्स कॉलेज आणि कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्नीकल कॉलेज, खेडमधील आय.सी.एस. कॉलेज ऑफ ऑर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स, चिपळूणमधील शरदचंद्रजी पवार इन्टिट्युट ऑफ अग्रीकल्चरल सायन्स, गुरुकुल कॉलेज आणि संजीवनी नर्सिंग कॉलेज अशा  8 महाविद्यालयांची जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी यासंदर्भात सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि प्राचार्यांना पत्र पाठविले आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी वर्च्यअल/ऑनलाईन पध्दतीने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रामध्ये आवश्यक बाबींची पुर्तता करावी. महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र प्रशिक्षण प्रदाता यांच्यासोबत समन्वय साधून हा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी होईल, या अनुषंगाने कार्यवाही करण्याची सूचनाही दिली आहे.

महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून, त्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा तसेच 20 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या उपस्थित  होणाऱ्या कार्यक्रमास त्या त्या महाविद्यालयांच्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी राहून उद्घाटन सोहळा पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×