स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांच्या कार्याचा गौरव हैदराबाद मध्ये तेलंगाना सरकार मार्फत सत्कार
कबनुर: हबीब शेखदर्जी
दि .१७ : कबनूर गावचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आले. हैदराबाद येथील रवींद्र भारती ऑडिटोरियम हॉलमध्ये सय्यद शहा नावाज अहमद कादरी द्वारा लिखित पुस्तक ब्लड स्पीक्स टू – द रोल ऑफ मुस्लिम्स इन इंडिया इंडिपेंडेंस या पुस्तकाचे प्रकाशन तेलंगानाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमारका यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी बॉम्मा महेश कुमार गोड अध्यक्ष तेलंगाना काँग्रेस कमिटी,मोलाना उबेदुला अजमी माजी राज्य सभा खासदार,डॉक्टर सुरेश खैरनार,रघु ठाकूर,जावेद आली खान खासदार ,हजरत मुफ्ती खलील अहमद साहेब,सय्य्द अजमुला हुसेनी चेअरमन वकफ बोर्ड,शमशुद्दीन नाईकवाडे व इतर भारतातील साहित्यकार व विचारवंन्त उपस्थित होते .
सदर पुस्तकामध्ये लेखकाने१८५७ ते १९४७ पर्यंत मुस्लिम स्वतंत्र्य स्वतंत्रता सेनानी यांचे महत्त्वपूर्ण भूमिका यावर प्रकाश टाकले आहे, तसेच विविध समुदाय यांचे योगदान आणि सन्मानित करण्याचे आव्हान सुद्धा या पुस्तकात करण्यात आले आहे. तेलंगानाचे उपमुख्यमंत्री भट्टी मल्लू विक्रम यांनी सदर पुस्तकाचे कौतुक केले तसेच स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी इंग्रजांसोबत लढत असताना आपला पाय गमावला व जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत देशाची अखंडता एकता टिकवण्यासाठी सतत अविरत प्रयत्न केले याचा लेखात जोखा सुद्धा प्रमुख मान्यवराने मांडला.
ब्लड स्पीक्स टू सदर पुस्तकामध्ये स्वतंत्रता संग्राम मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे ग्रामीण भागातील स्वतंत्रता सेनानी यांचा नाम उल्लेख केला आहे सदर पुस्तक आज आणि येणारी पिढींना एक आदर्श कार्य देण्याचा प्रयास केला आहे. पुस्तकाचे इंग्रजी अनुवाद करणारे प्रवेज आलम सिद्दिकी यांनी सदर पुस्तक देशातील सर्व वाचनालय मध्ये उपलब्ध करून देण्याचे मानस व्यक्त केला आहे कारण अशा ग्रामीण भागातील स्वतंत्र सेनानी यांच्या बद्दल समाजामध्ये व्यापक जागरूकता आणण्याची गरज आहे. हे ५०४ पानाचे असून जागतिक स्तरावर याचे प्रकाशन केले आहे.
सदर रवींद्र भारती ऑडॉटोरीयम हॉलमध्ये शहीद अशफाकुल्ला खान व स्वतंत्र वीर निजामुद्दीन काझी यांच्या परिवारांचा गौरव करण्यात आला.स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांचे वंशज नुरुद्दीन काजी यांनी आपल्या वडिलांचे फोटो कबनूर परिसरातील सर्व शाळेंना देऊन दिनांक १२ डिसेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस निमित्त सर्वांनी शाळेत साजरा करून येणाऱ्या पिढीला स्वतंत्र वीर निजामुद्दीन काझी यांच्या धाडसाच्या कथा सांगून प्रेरणा द्यावी असे आवाहन केले .
सदर कार्यक्रम तेलंगना सरकार यांच्या मार्फत आयोजित केले होते.या प्रसंगी पूर्ण भारतातील विविध भागातील लोक उपस्थित होते.शेवटी जावेद अहमद यांनी आभार मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.