इचलकरंजी: habib shekhdarji
दि. 03 इचलकरजी येथील शालेय व महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना जमियात उलमा ,महाराष्ट्र यांच्याकडून शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. नुकताच जमीअत उलमा जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने इचलकरंजी येथील जवाहर नगर रोशन मज्जिद येथे संघटनेचा मेळावा पार पडला. या मेळावा मध्ये इचलकरंजी येथील गरीब कुटुंबातील कु.अल्फिया खुदबुद्दीन इनामदार व कुमार श्रेयस अरुण कुडचे या विद्यार्थ्यांना प्रत्येक 15 हजार रुपयाची त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत म्हणून धनादेश देण्यात आला. सदरचा धनादेश उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आला . यावेळी समाजातील प्रमुख मंडळी व पालक उपस्थित होते.
मुस्लिम समाजासाठी काम करणाऱ्या जमियात उलमा नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सर्वधर्मसमभाव समता बंधुता आणि मानवता यांचा संदेश आपल्या कार्यातून देत असून राष्ट्रहित ही जोपासण्याचा प्रयत्न करत असते.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष हाफिज मैनुद्दीन जनरल सेक्रेटरी मौलाना मुजीब काश्मी, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मौलाना अब्दुल मुजीब पेंढारी, जिल्हा जॉईट सेक्रेटरी हाफीज लियाकात जमादार इचलकरंजी उपाध्यक्ष मौलाना शोएब जॉईट सेक्युरिटी मौलाना इनुस, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष मौलाना मौलाना सईद, उपाध्यक्ष हाफिज बशीर ,खजिनदार हाफिज शहानवाज, हाफीज जाफर, इम्तियाज म्हैशाळे (सर )मुसाअली मुल्ला (सर ) हाजी अरिफ पटेल सर ताजुद्दीन फकीर नजीर खलिफा ,मन्सूर डफेदार, कोल्हापूर जिल्हा मीडिया संपर्कप्रमुख व महालक्ष्मी टाईम चे जिल्हा पत्रकार हबीब शेख दर्जी आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.