ताराराणी पक्षाच्या वतीने इचलकरंजी शिवतीर्थ येथे जल्लोष
साखर व पेढे वाटत ,फटाक्याची आतिषबाजी
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.३:नुकत्याच झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी उत्तुंग यश प्राप्त केलेबद्दल ताराराणी पक्षाच्या वतीने शिवतीर्थ येथे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी साखर व पेढे वाटत फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलागना या चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. त्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत सत्ता स्थापन केली आहे. या अभुतपूर्व विजयाबद्दल ताराराणी पक्षाच्या वतीने शिवतीर्थ येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. साखर-पेढे वाटत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. सर्वच नागरिकांना आणि मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांना साखर वाटत त्यांनाही आनंदोत्सवात सामील करुन घेतले.
यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाला मिळालेला विजय हा सर्वसमान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. मोदी यांनी देशभरात केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास वाढला असून आगामी 2024 च्या निवडणूकीतही भाजपला मोठे यश मिळेल, असे सांगितले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नरसिंह पारिख, बंडोपंत लाड, आबा पोवार, सर्जेराव पाटील, राजेंद्र बचाटे, मोहन काळे, श्रीकांत टेके, आनंदा दोपारे, राजू देसाई, अनिल बम्मनावर, कोंडीबा दंडवते, ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, मंगला सुर्वे, तुळसाबाई काटकर, सीमा कमते, अंजुम मुल्ला, सपना भिसे, विजय कोराणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.