कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचा ऐतिहासिक विक्रम – ०% निव्वळ एनपीए व रु. ५५ कोटी नफा

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि. 1एप्रिल 2025 कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक ऐतिहासिक कामगिरी केली असून, बँकेचा निव्वळ एनपीए ०% राखण्यात यश मिळवले आहे. तसेच, बँकेने रु. ५५ कोटींचा उच्चांकी नफा नोंदवला आहे. बँकेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी समाधान व्यक्त केले.

बँकेचा विक्रमी व्यवसाय आणि आर्थिक प्रगती
आजच्या आर्थिक मंदीच्या काळातही बँकेने आपली घोडदौड कायम ठेवत मार्च २०२५ अखेर एकूण व्यवसाय रु. ४७०८ कोटी इतका वाढवला आहे. त्यामध्ये ठेवी रु. २८६२ कोटी आणि कर्ज रु. १८४६ कोटी यांचा समावेश आहे. बँकेचे भागभांडवल रु. ७७ कोटी झाले असून, आर्थिक तरतूदीपूर्वीचा नफा रु. ५५ कोटी इतका झाला आहे.

यशामागील सूत्रधार
बँकेचे संस्थापक चेअरमन माजी खासदार श्री कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनामुळे बँकेने प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावला आहे. बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी या यशाचे श्रेय ठेवीदार, कर्जदार, ग्राहक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासाला दिले आहे.

बँकेची आर्थिक स्थिती (२०२४-२५ अखेर) :

ठेवी: रु. २८६२ कोटी

कर्ज: रु. १८४६ कोटी

एकूण व्यवसाय: रु. ४७०८ कोटी

ढोबळ नफा: रु. ५५ कोटी

ढोबळ एनपीए: ७.३४%

निव्वळ एनपीए: ०%

सीआरएआर (CRAR): १३.३५%

अर्थव्यवस्थेतील आव्हाने आणि बँकेचा ठाम निर्धार
सध्याच्या युद्धजन्य परिस्थिती, वाढते व्याजदर, कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय अस्थिरता यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. मात्र, अशा कठीण काळातही बँकेने आपल्या ढोबळ व निव्वळ एनपीएचे प्रमाण घटवून ०% निव्वळ एनपीए राखण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

लहान उद्योजकांसाठी विशेष प्रयत्न
बँकेने एकूण कर्जाच्या ५०% म्हणजेच रु. २५ लाखांपर्यंतच्या लहान कर्जाची संख्या वाढवली, ज्यामुळे लहान उद्योजक आणि कर्जदारांना दिलासा मिळाला. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (PMEGP), आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, ओबीसी वित्त महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ अशा अनेक योजनांद्वारे समाजातील विविध घटकांना आर्थिक मदत मिळाली आहे.

ठेवीदार आणि ग्राहकांचा विश्वास – बँकेच्या यशाचा मूलमंत्र
ठेवीदारांनी बँकेवर दाखवलेला अतूट विश्वास, तसेच कर्जदारांनी कठीण परिस्थितीतही वेळेवर परतफेड केल्यामुळे बँकेने आपली आर्थिक स्थिती भक्कम ठेवली आहे. बँकेच्या चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी उपस्थित मान्यवर :
सदर प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, महेश सातपुते, बंडोपंत लाड, रमेश पाटील, शैलेश कित्तूरे, बाळकृष्ण पोवळे, द्वारकाधीश सारडा, शैलेश गोरे, सुभाष जाधव, बाबूराव पाटील, तात्यासो अथणे, अविनाश कांबळे, अॅड. सारंग जोशी, तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजू चव्हाण, योगेश पाटील व सचिन देवरुखकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दिपक पाटील व इतर पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×