KCP’ चे दैदिप्यमान यश, ‘AIIMS’ मध्ये दिमाखदार प्रवेश

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि.४ :येथील विशाल पागडे सर यांच्या ‘किशोर करिअर पाईंट (KCP) ने IIT बरोबरच ‘NEET’ या वैद्यकिय प्रवेशाच्या निकालात दैदिप्यमान यश मिळवले आहे. शहराबरोबर ग्रामीण, भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकिय व अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी अव्वल असणारी अॅकॅडमी म्हणून ‘केसीपी’ कडे पाहिले जाते.

एनटीएद्वारे घेण्यात आलेल्या NEET-2024 परीक्षेत भारतामधून लाखो विद्यार्थी तर महाराष्ट्रातून पावणे तीन लाख विद्यार्थी बसले होते. केसीपीच्या कार्तिक सातपुते (705/720), प्रज्वल पाटील (691/720), प्रियंका नरूटे (690/720) या तीन विद्यार्थ्यांनी निकालाची नवी क्षितीजे गाठली आहेत. 600 हून अधिक गुण मिळवणारे तब्बल 61 विद्यार्थी आहेत.

प्रथम राऊंडमधून कार्तिक सातपुते आणि ऐश्वर्या कांबळे या विद्यार्थ्यांना AIIMS, नागपुर या अग्रगण्य वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक नामांकित वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.

अनभवी आणि तज्ञ प्राध्यापक उत्कृष्ट नियोजन शिस्त मातत्याने सराव विद्यार्थांचे कष्टयातून हे धवल यश मिळाले आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. I या यशासाठी अध्यक्ष-विशाल पागडे, सौ. ज्योती पागडे, को-ऑर्डिनेटर डॉ. पूजा रूईकर, दत्तात्रय पिट्टा, सचिन जाधव व अशोककुमार तसेच सर्व प्राध्यपकांचे योग्य व बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×