कोकण रहिवासी समाज संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व कोकण रत्न पुरस्कार प्रदान…..

पुणे:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)

दि:३१:जुलै: कोकण रहिवासी समाज संघ, सिंहगड रोड पुणे शहरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कोकण रत्नांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला

पाठ्यपुस्तकातील दोन धडे कमी शिकले तरी चालतील पण पालकांचा मुलांशी संवाद हवा. कोणताही निर्णय घेताना एकदा आई – वडिलांचा चेहरा समोर आणा, तुमचा कोणताच निर्णय चुकणार नाही. आई – वडिलांची मुलांसाठीची स्वप्ने खूप मोठी असतात. परंतु सध्या संवाद अभावी घडतोय विसंवाद होत असल्याची खंत रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली. यावेळी पीएसआय परीक्षेत महाराष्ट्र मधून प्रथम आलेल्या रुपाली सोनू सकपाळ व सीए झालेल्या तृप्ती रमेश होडे,प्राजक्ता जाधव यांना यावेळी कोकण रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा, माजी सैनिक, पत्रकार यांचा देखील सन्मान करण्यात आला.तर मृणाल मोरे,सिद्धीता मोरे यांनी बाईपण भारी देवा या गाण्यावर न्रुत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ,माजी नगरसेवक हरिदास चरवड, काकासाहेब चव्हाण, विकास दांगट, बाबा धुमाळ, सुनीता खंडाळकर, अभिनेत्री दर्शना पाटील, लक्ष्मण मोरे, कोकण रहिवाशी समाज संघाचे अध्यक्ष प्रकाश यादव, लक्ष्मण कदम, राकेश जाधव, श्रीधर शेलार, संदेश जंगम, राजु मोरे, अरविंद पवार, अरुण घाणेकर, अनिल उपाळे, संजय जाधव, अंकुश मोरे, सुनील मोरे,मारुती गोगवले,तेजस जंगम,नितीन मोरे,साहिल जाधव,अभिषेक सकपाळ, आदी उपस्थित होते. आभार लक्ष्मण कदम यांनी मानले.  यावेळी सिंहगड रोड परिसरातील मोठ्या प्रमाणात कोकणवाशिय उपस्थित होते.

मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढल्याशिवाय मुलांची प्रगती होणार नाही. चार भिंतीत दिलेले शिक्षण समाजात रुजायला हवे. विद्यार्थ्यांमधील संस्कार समाजात उतरायला हवेत. त्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांचीसुद्धा तेवढीच जबाबदारी महत्वाची आहे, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.

यावेळी कोकण भवनाची मागणी कोकण रहिवासी समाज संघाच्या वतीने धायरी येथील येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. दरम्यान पुण्यात कोकण भवन उभारण्यात यावे,अशी मागणी अध्यक्ष प्रकाश यादव यांनी केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×