तालुक्याचे नंदनवन करणारा गणपतराव पाटील यांच्यासारखा आमदार निवडून देवूया: अरविंद धरणगुत्तीकर

शिरोळ:राम आवळे 
दि .११ :गणपतराव पाटील यांचे सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये ऋषीतुल्य काम आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची ही निवडणूक असून तालुक्याचे नंदनवन करणारा गणपतराव पाटील यांच्या सारखा आमदार आपण निवडून देवूया. दमदाटीचे राजकारण चालणार नसून जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी ग्वाही अरविंद धरणगुत्तीकर यांनी दिली.धरणगुत्ती येथे पदयात्रा, रॅली नंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
श्री दत्त कारखाना संचालक शेखर पाटील म्हणाले, विद्यमान आमदारांनी गाव विकास थांबवण्यासाठी आपल्या आमदारकीचा उपयोग केला आहे. आतापर्यंत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास केला जात होता, पण या आमदारांनी विकास विरोधी भूमिका ठेवली आहे. गणपतराव पाटील यांना आपण उच्चांकी मतदान करून निवडून देऊ.
पांडुरंग रजपूत म्हणाले, गणपतराव पाटील यांनी सामाजिक जीवनात काम करताना शेतकरी, पर्यावरण, कलाकार, खेळाडू, शिक्षण, सहकार अशा विविध माध्यमातून काम केले आहे. गेल्या दहा वर्षात अतिशय कार्यकुशलतेने आणि नियोजनबद्धरीत्या, एक विचाराची क्षमता धारण करून, नवा दृष्टिकोन ठेवून स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा तालुक्यात उमटवला आहे. मातीला जिवंत करण्याचे काम त्यांनी करून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. शिरोळ तालुक्याच्या विकासाचा नवा पॅटर्न ते निर्माण करतील.
रमेश शिंदे, स्नेहलता देसाई, सुरेश कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. गणपतराव पाटील यांनी मतदारांनी सावध राहावे आणि मनाची खंबीरता ठेवून तालुक्याच्या विकासासाठी आपणास मतदान करावे असे आवाहन केले. आभार आप्पासाहेब पाटील यांनी मानले.
चंगेजखान पठाण, वैभव उगळे, मधुकर पाटील, रेखा पाटील, आशाताई वाडीकर, हसन देसाई, राजू आवळे, राजश्री मालवेकर, सरपंच श्रीमती विजया कांबळे, काकासाहेब पाटील, अशोक पाटील, जीत रजपूत, सुरेश आरगे, भालचंद्र लंगरे, मनोहर माळी, शिवराज पवार, विलास जाधव, सुरेश पखंडी, बाजीराव पवार, परशुराम दशवंत, राहुल मेस्त्री, अमोल जगदाळे, अक्षय माने, आप्पासो कोळी, सुंदर कांबळे, बाळू उगारे, दगडू उगारे, चंद्रकांत चौगुले, अतुल नरदे, आप्पासो पाटील, दिनेश कांबळे, मलगोंडा पाटील, अशोकराव जाधव, संजय नांगरे, सुशांत कांबळे, भाऊसो कांबळे, धोंडीराम हेरवाडे, श्रीपती पाटील, सुखदेव बंडगर, राजू पाटील, सुजाता सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हरोली येथे पदयात्रे नंतर झालेल्या सभेत पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय माने, हसन देसाई, रवी जाधव, प्रा. टी. एस. पाटील, रफिक मुजावर, अमोल कांबळे यांनी गणपतराव पाटील यांच्या कामाचा आढावा घेऊन आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या.
शामराव कदम, मधुकर कांबळे, अब्बास मुजावर, अनिल कांबळे, एम. डी. नकाते, राजू कांबळे, कुमार कांबळे, दादू कांबळे, मुबारक मुजावर, शौकत मुजावर, वसंत कदम, कृष्णा माळी, विजय माळी, बाबुराव कोळी, युनूस जमादार, ऐनूद्दीन मुजावर, विलास कांबळे, महावीर चौगुले, अमोल कांबळे, वैभव गुजरे, शैलेश कांबळे, स्नेहल कांबळे, चेतन कांबळे, अतुल कांबळे, मंगलाताई चव्हाण, वसंतराव देसाई, रमजान मुजावर, अजित पाटील, सुभाष परीट, संजय गुरव, मुबारक मुजावर, संजय कांबळे, सुनील भोसले, विश्वास शिंगे यांच्यासह मतदार ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×