संगमेश्वरात लायन्स महोत्सवाचे जल्लोषात आयोजन
६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी, नागवेकर मैदान, आंबेड
संगमेश्वर :
मागील तीन वर्षांपासून संगमेश्वर परिसरातील नागरिकांना आकर्षित करणारा आणि सर्व वयोगटातील लोकांची उत्सुकता वाढवणारा लायन्स महोत्सव यंदा अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान शास्त्रीपुल, आंबेड, नागवेकर मैदान येथे या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
————————————————————-
✨ अद्विता फर्निचर ✨
इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, मोबाईल आणि आता फर्निचरचे अद्वितीय कलेक्शन!
प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू!
सर्वात स्वस्त ५ दिवस – विशेष ऑफर!
डाउन पेमेंट ₹० | ०% व्याजदर | बजाज फायनान्स उपलब्ध
स्थळ:
तुरळ-कडवई रोड, मुंबई-गोवा महामार्गाच्या शेजारी,
ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
संपर्क:
7350270447 / 9322886712.
————————————————————-
वाढलेला कालावधी, वाढलेला आनंद
गेल्या वर्षभरात ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि वाढत्या मागणीमुळे यंदा महोत्सवाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या महोत्सवात ५० हून अधिक स्टॉल्स असणार असून, खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू, औषधे, खेळणी, वस्त्रप्रावरणे आदींची विक्री केली जाणार आहे. याशिवाय ग्राहकांसाठी आकर्षक लकी ड्रॉ, मुलांसाठी खास मनोरंजन पार्क, तसेच नृत्य, संगीत, विविध कलाविष्कार आदींचा समावेश असणार आहे.
समाजसेवेचा वसा कायम
लायन्स क्लब संगमेश्वर केवळ महोत्सवाच्या आयोजनापुरता मर्यादित न राहता, विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असतो. यामध्ये गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरीब वयोवृद्धांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, अंध व अपंग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी व सेवा, तसेच पूरग्रस्तांना मदतीचे कार्य हाती घेतले जाते.
सर्वांसाठी आनंदाचा सोहळा
गृहिणींसाठी उपयोगी साहित्य, स्वादिष्ट खाद्य पदार्थ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि लहानग्यांसाठी आकर्षक खेळण्यांचे स्टॉल्स यामुळे हा महोत्सव संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी ठरणार आहे.
लायन्स क्लब संगमेश्वरचे अध्यक्ष सुशांत कोळवणकर व लायन्स महोत्सव संगमेश्वरचे अध्यक्ष विवेक शेरे यांनी या आनंद सोहळ्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.