कडवई तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र जाधव यांची निवड

 

**रत्नागिरी:**

महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी आणि गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने २००७ साली सुरू केले. संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कडवईची ग्रामसभा नुकतीच पार पडली, आणि या ग्रामसभेत महेंद्र विठ्ठल जाधव यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

महेंद्र जाधव हे मैत्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून, या संस्थेमार्फत ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवतात. कडवईमध्ये २००७ पासून ते मैत्री क्रीडा मंडळ चालवत असून, या मंडळाच्या माध्यमातून अनेक कबड्डी खेळाडू घडवले गेले आहेत.

जाधव यांच्या निवडीबद्दल कडवई पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×