स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन कारखानदारांच्या फायद्याचे व शेतकऱ्यांचे तोट्याचे — महादेव कोरे
मिरज:प्रतिनिधी
दि:०८:डिसेंबर: एफ.आर.पी च्या ऊसाचे पैसे कायद्याने देणे बंधनकारक आहे. एफ.आर.पी च्या वर ज्यादा पैसे देण्यास काहीही बंधन नाही! राजू शेट्टी ही प्रत्येक वर्षी एफ.आर.पी मागतात.( कारखानदारांच्या फायद्यासाठी) परंतु सी.रंगाराजन समितीप्रमाणे ऊसाच्या उपपदार्थांमधील 50 टक्के नफा दिला पाहिजे. अशी कायद्यात तरतूद आहे. दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट काढून टाकली तरच ऊसाला ५००० रूपये दर मिळेल असे आमचे नेते मा.रघुनाथदादा पाटील म्हणतात. पण ऊस उत्पादकांना नुकसानीत घालणारे हे राजू शेट्टी अंतराच्या अटीवर ब्र शब्द बोलत नाहीत. म्हणजेच राजू शेट्टी हे कारखानदाराच्याच बाजूचे आहे.
ऊसाच्या एका टना पासून नव्वद लिटर इथेनॉल तयार होते. लिटरला 65 ते 70 रुपये दर आहे. त्याचे 6300 रुपये होतात. कारखानदारांना ऊस तोडणीच्या खर्चासाठी तेराशे रुपये सोडले तर मा.रघुनाथदादा 5000 ची मागणी ही योग्य आहे. 80 % साखर ही उद्योगाला लागते कोल्ड्रिंग, स्वीट्स, औषधे यासाठी 80 % साखर उद्योगासाठी लागते. 20% ही जनतेला लागते 80% साखरेचा दर 100 रुपये करावा व 20 टक्के साखर जनतेला रेशनिंगला फुकट द्या.
शरद जोशींनी दहा वर्षे ऊसाची झोनबंदी उठली पाहिजे म्हणून आंदोलने तीव्र केले. त्यामध्ये बरेच शेतकरी ऊस आंदोलनात शहीद झाले व झोनबंदी उठली उसाला 560 वरून 3000 रुपये दर मिळू लागला.
मा.रघुनाथ दादा म्हणतात “दोन कारखान्यामधील अंतराची अट काढून टाका म्हणजे पाच हजार रुपये दर मिळू शकतो” तसेच आम्हास लागणारी शेतीची खतांचे दर भरमसाठ वाढले आहेत. मजुरी व पाणीपट्टी औषधे दर वाढले आहेत. तसेच आसमानी व सुलतानी संकट अवकाळी रोगराई पाऊस कमी गारपीट यामुळे ऊसाचे टनेज घट झाली आहे. साखरेचे दर एका क्विंटलला 3800 रुपये झाला आहे. पुढे अजून साखरेचे दर वाढणार आहेत. तरी वरील सर्व बाजूचा विचार करून मा.रघुनाथ दादांची मागणी योग्य आहे.
स्वाभिमानीने शेतकऱ्यांचा तोटा केला आहे. हे शेतकऱ्यांनी विचार करावा कोणत्या शेतकरी संघटनेत जायचे हे ठरवावे राजू शेट्टी हे वरील सर्व मागणी करीत नाहीत फक्त एफ.आर.पी मागतात म्हणजे कारखान्याच्या बाजूच्या आहेत. हे अगदी सिद्ध झाले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.