मुरडव नं. १ शाळेचे जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये यश
संगमेश्वर:नियाझ
दि.१९,: डेरवण येथे रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागा मार्फत घेण्यात आलेल्या शाळेय क्रिडा स्पर्धेमध्ये जिल्हा प्राथमिक शाळा मुरडव नं. १ ने घवघवीत यश संपादन केले आहे.
या शाळेतील तीन विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर खेळण्याची संधी मिळाली मोठा गट मुलगे कबड्डी या खेळामध्ये कु. सुजल संतोष कदम याची तालुका संघात निवड झाली असुन त्याला डेरवण येथील जिल्हा स्तरावरील कबड्डी खेळामध्ये आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. तसेच याच शाळेतील इयत्ता ५ वी तील कु. गौरी संतोष चव्हाण व कु. नेहा अशोक गांगरकर यांची लहान गट मुली कबड्डी या खेळामध्ये खेळण्याची संधी मिळाली. कबड्डी लहान गट मुली या मध्ये हा संघ अंतिम विजेता ठरला.त्यांनी आपल्या खेळाचे उत्तम नैपुण्य दाखवले असून या तीनही विद्यार्थ्यांचे मुरडव तसेच पंचक्रोशीतील विविध स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे. त्यांना या साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय सुवरे प्रशिक्षक श्री. रामसागर रेडेकर, वर्गशिक्षिक श्री. रूपेश शिंदे, श्री अमोल बाटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य. मुरडव येथील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.