राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर गद्दारीचा शिक्का; राजेंद्र फाळकेंविरोधात कार्यकर्ते आक्रमक
दोन्ही बाजार समित्या शिंदेच्या ताब्यात
कर्जत:प्रतिनिधि
दि:१३:जून:नुकतेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती हे भाजपचे आमदार राम शिंदे गटाचे निवडून आले. याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना जबाबदार धरल्याचे बोलले जाते. त्यामुळं मत फुटल्याचा राग मनात धरून रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आज कर्जत येथील राजेंद्र फाळके यांच्यावर मोर्चा वळवला. यावेळी फाळके यांच्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त केला.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या बाजार समितीमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात थेट लढत झाली होती. बाजार समितीचीच्या मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत शिंदे आणि पवार यांच्या पॅनलला समान नऊ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही गटांना समसमान नऊ जागा मिळाल्याने येथे सभापती निवडीसाठी पेच निर्माण झाला होता. दरम्यान, रविवारी कर्जत बाजार समितीच्या सभापतींची निवड झाली.
या मतदानात रोहित पवार गटाच्या सभापतीपदाच्या उमेदवारला आठ मते मिळाली. तर एका संचालकांचे मत बाद झाले. उपसभापदीपदामध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराला एक जास्त म्हणजे, 10 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये दोन्ही जागा राम शिंदे यांच्या गटाला मिळाल्या. हा रोहित पवारांना मोठा धक्का असून ही बाजार समिती राम शिंदेच्या ताब्यात आली. त्यामुळं रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
संतप्त कार्यकर्त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी आज थेट राजेंद्र फाळके यांच्या घरावरच आपला मोर्चा वळविला. यावेळी कार्यकर्त्यांनी फाळके यांच्या घरावर गद्दार असे लिहित जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी
दरम्यान, याबाबत जिल्हाध्यक्ष फाळके यांच्याशी संपर्क साधला असता मोर्चा घेऊन कोण होते? का आले होते? याचा शोध घेतला जाईल असे सांगितले. मात्र पुढील प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत संचालक फुटल्याने घटना घडली असावी असं बोलल्या जातं आहे.
दोन्ही बाजार समित्या शिंदेच्या ताब्यात
कर्जत बाजार समितीच्या सभापतीपदी शिंदे गटाचे काकासाहेब तापकीर, तर उपाध्यक्षपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे.
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही दोन्ही गटांना समसमान मते मिळाली होती. तिथं राम शिंदे गटाचे उमेदवार ईश्वरचिठ्ठीवर सभापती झाला, तर रोहित पवार गटाचा उपसभापती झाला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.