नेस्कोत रंगला गीत गायनाचा कार्यक्रम; दिग्गज गायकांनी केले भक्तीगीत सादर
मुंबई:प्रतिनिधी
दि.१३ : मुंबई महानगर प्रदेशातील 29 हजार कोटींहून अधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात पार पडला. या कार्यक्रमापूर्वी प्रसिद्ध मराठी गायकांच्या देशभक्ती, भावगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली होती.
राधा ही बावरी, गालावर खळी या प्रसिद्ध गाण्यांचे गायक स्वप्निल बांदोडकर, धर्मवीर चित्रपटातील ‘भेटला विठ्ठल’ या गाण्याचे गायक मनिष राजगीरे, गायिका मुग्धा कराडे, कविता राम यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले होते. या गीत गायनाच्या कार्यक्रमामुळे समारंभात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.
मराठी कलाकारांच्या गीत सादरीकरणामुळे मुंबईतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संमारभ मुंबईकरांच्या स्मरणात राहण्यासारखा होता. गीतगायन कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.