पुणे:प्रतिनिधी
दि:०५:Jan: कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) कोथरूड भागात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात असणाऱ्या भागात ही घटना घडली आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी मोहळवर तीन गोळ्या झाडल्या असून, मोहळला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर मोहळची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज (दि. 5) दुपारी 1.30 च्या सुमारास कोथरूड भागातील सुतरदरा या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी शरद मोहळ याच्या दिशेनं 3 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी मोहळच्या खांद्याला लागली आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर गजबजलेल्या सुतारदरा भागात मोठी खळबळ उडाली असून, जखमी अवस्थेतील शरद मोहळला कोथरूड येथील सह्याद्री रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती देताना पोलिसांना सांगितले की, आज दिनांक 05/01/2024 रोजी दुपारी 13.30 वा शरद हिरामण मोहोळ वय 40 वर्षे, रा. सुतारदरा, कोथरूड पुणे, याच्यावर संशयित 3 ते 4 इसमांनी गोळीबार केला आहे. या घटनेत मोहोळ जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास कार्यवाही चालू असून, आरोपींना पकडण्यासाठी टीम रवाना करण्यात आल्या आहेत.
मोहोळने येरवडा कारागृहात विवेक भालेरावच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोपी कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणात जामीनही मिळाला होता. जुलै 2022 मध्ये मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपारही करण्यात आले होते. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहळला पिंटू मारणे हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणात त्याला पुन्हा अटक झाली होती.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.