७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण संपन्न…

कोल्हापूर,प्रतिनिधी 

दि .२६: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

          संघाचे ताराबाई पार्क येथील आवारात संचालक डॉ.सुजित मिणचेकर यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करणेत आले. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणा-या संघाच्‍या दूध शितकरण केंद्रावरही राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करणेत आले. गोगवे चिलिंग सेंटर संचालक अमरसिंह पाटील, गडहिंग्‍लज चिलिंग सेंटर संचालक नविद मुश्रीफ, बिद्री चिलिंग सेंटर संचालक किसन चौगले, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक मुरलीधर जाधव, तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक नंदकुमार ढेंगे, व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना ये‍थे संचालक प्रकाश पाटील यांच्‍या हस्‍ते करणेत आले.

यावेळी संघाचे संचालक डॉ.चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×
15:10