प्रा. चंद्रशेखर शहा यांचे क्रीडा क्षेत्रासाठी अमूल्य योगदान सेवानिवृती समारंभात विविध मान्यवरांकडून कौतुकांचा वर्षाव
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .१२ :एक खेळाडू, क्रीडाशिक्षक म्हणून प्रा. चंद्रशेखर शहा यांचे क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. खेळाडूंना आणि क्रीडा शिक्षकांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. चंद्रशेखर शहा यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. निमित्त होते ते प्रा. चंद्रशेखर शहा यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे.
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभागप्रमुख तथा राष्ट्रीय खेळाडू प्रा. चंद्रशेखर शहा यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे खासदार धनंजय महाडीक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार राजीव आवळे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व डिकेटीई संस्थेचे संचालक रवी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थित हा सत्कार सोहळा संपन्न झाला. प्रा. शहा यांचा कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वच मान्यवरांनी प्रा. शहा यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचे आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचे भरभरुन कौतुक केले.
याप्रसंगी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, पोलिस उपअधिक्षक समिरसिंह साळवे, दादासाहेब लाड, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, ताराराणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटील, ताराराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, एकनाथ आंबोकर, माणिक वाघमारे, श्रीनिवास बोहरा, कृष्णा बोहरा, गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, नरसिंह पारिक, श्रीरंग खवरे, सतीश मुळीक, राहुल घाट, राजेंद्र बचाटे, कोंडीबा दवडते, रमेश पाटील, अनिल शिकलगार, राजू बोंद्रे, पुंडलिकभाऊ जाधव, पै. अमृत भोसले, विकास कांबळे यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शहा परिवाराच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.