आमदार म्हणून राहुल आवाडे यांनी घेतली शपथ

वस्त्रनगरीत जल्लोष साजरा

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि .८ :संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मताधिक्य घेऊन विजयी झालेले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी रविवारी मुंबईतील विधानभवनात आमदारकिची शपथ घेतली. आमदार म्हणून राहुल आवाडे यांनी शपथ घेताच वस्त्रनगरीत जल्लोष साजरा करण्यात आला.
           नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा ५६ हजार ८११ अशा मताधिक्याने पराभव केला. राहुल आवाडे यांना १  लाख ३१  हजार ९१९ तर मदन कारंडे यांना ७५ हजार १०८ इतकी मते मिळाली. राहुल आवाडे यांनी जिल्ह्यातील विक्रमी उच्चांकी मताधिक्य घेत एक नवा विक्रम निर्माण केला.
         आवडे विरुद्ध  कारंडे  ही लढत काटे की टक्कर होणार अशी अटकळ बांधली गेली होती. सर्व नेते एका बाजूला कारंडे यांच्या पाठीशी  आणि दोन दिग्गज नेत्यासोबत राहुल आवाडे अशी लढत महाविकास आघाडीच जिंकणार असे  चित्र निर्माण झाले होते. परंतु सर्व तर्क वितर्क यांना  छेद देत राहुल आवारे ने एकतर्फी विजय प्राप्त केला. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×