श्री दत्त साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पास सातत्यपूर्ण कामगिरी विशेष श्रेणी पुरस्कार जाहीर
'दत्त शिरोळ'चे विजयकुमार इंगळे ठरले देशात सर्वोत्कृष्ट सहवीज (कोजन) व्यवस्थापक
शिरोळ:राम आवळे
दि.३ :साखर उद्योगाकडून चालवल्या जाणार्या सहविज निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यामध्ये सहकारी व जादा बॉयलर प्रेक्षर क्षमता गटात श्री दत्त शिरोळचे विजयकुमार इंगळे यांना उत्कृष्ट सहवीज कोजन व्यवस्थापक म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच उत्कृष्ट सहकारी सहवीज निर्मिती प्रकल्प ज्यादा बॉयलर प्रेशर क्षमता गटामध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला विशेष श्रेणी पारितोषिक प्राप्त झाले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा को जनरेशन असोशियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष शरद पवार व कोजन असोसिएशनचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत 11 जानेवारी २०२५ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्री गणपतराव पाटील दादा चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक व कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा सहवीज प्रकल्प अतिशय व्यवस्थित सुरू असून सदर पुरस्कारामुळे कारखान्याचे कर्मचारी व सभासद वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.