पंचगंगा साखर कारखाना तर्फे देशभक्त रत्न कुंभार यांना अभिवादन

कबनू र : हबीब शेखदर्जी 
दि. १५ :स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंती निमित्त पंचगंगा साखर कारखाना स्थळावरील येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व समाधी स्थळाचे दर्शन घेवून साखर कारखान्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी चेअरमन पी. एम पाटील, व्हा.चेअरमन जयपाल कुंभोजे व संचालक मंडळ ; कर्मचारी वर्ग उपस्थित होते

. रत्नाप्पाण्णा कुंभार यानी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून १७ वर्षे भूमिगत राहून लढा दिला. सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना काढून त्याच्या माध्यमातून कार्य-क्षेत्रातील गावांचा कायापालट केला. त्यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा घेऊन कारखान्यास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी आम्ही संचालक कार्यरत आहोत असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यानी केले.
यावेळी प्र. का. संचालक नंदकुमार भोरे, रेणुका शुगर्सचे जनरल मॕनेंजर प्रकाश सावंत, केन मॕनेंजर सी. एस. पाटील, इंटकचे अध्यक्ष आझाद शेख, आण्णासाहेब क्वाणे, कबनूरचे माजी सरपंच उदय गीते आदि उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×