संगमेश्वर- जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत कडवई प्रभाग हिवाळी क्रीडा स्पर्धा कुचांबे येथे संपन्न

संगमेश्वर: सचिन पाटोळे 

दि १९ :दरवर्षी संपन्न होणाऱ्र्या  प्रभागस्तरीय हिवाळी शाळेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन यावर्षीही करण्याचे रत्नागिरी जिल्हा परिषदेने ठरवले असल्याने संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद केंद्र शाळा कुचांबे येथे मा.जि.प.अध्यक्ष मा.श्री संतोष थेराडे , गटशिक्षणाधिकारी मा.श्री पाटील सर, कुचांबे सरपंच मा.सौ.वंदनाताई थेराडे, उपसरपंच मा. श्री. समीर चव्हाण,मा श्री कृष्णा थेराडे यांच्या शुभहस्ते पार पडला.


यावेळी मार्गदर्शन करताना श्री संतोष थेराडे म्हणाले  की विद्यार्थी व्यक्तीमत्व घडविण्यात मैदानी खेळाचे अत्यंतिक महत्व असुन विद्यार्थ्यांना खिलाडीवृत्ती जोपासण्यासाठी  जि.प.शाळेंचे उपक्रम व स्पर्धेतुन महत्वाची संधी मिळते.
हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळने गरजेचे आहे . स्पर्धेत भाग घेणारे संघ त्यांचे खेळाडू उपलब्ध वेळ यांची सांगड घालून विद्यार्थी खेळाडूंनी खेळांमध्ये यशस्वी व्हावे व आपल्या शाळेचे,गावाचे, शिक्षकांचे नाव लौकीक करावे असे आवाहन संतोष थेराडे यांनी केले.
हा कार्यक्रम शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कुचांबे यांच्या सौजन्याने पार पडला.
सदर कार्यक्रमाला कुचांबे गावातील ग्रामस्थ,जि प.शाळेचे केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक यांचा हातभार लागला, विशेष म्हणजे भोजनाचा व संपुर्ण कार्यक्रमांचा खर्च जि.प.माजी अध्यक्ष श्री संतोष थेराडे यांनी केला. बक्षीस वितरण समारंभात बोलताना थेराडे यांनी सांगितले की कडवई प्रभाग मधील विजयी सर्व संघांना थेराडे यांच्या कडुन टीशर्ट चे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मा.जि.प.अध्यक्ष मा.श्री संतोष थेराडे , गटशिक्षणाधिकारी मा.श्री प्रदीप पाटील सर, माजी जि.प.सदस्य शंकर भुवड,कुचांबे सरपंच मा.सौ.वंदनाताई थेराडे, उपसरपंच मा. श्री. समीर चव्हाण, तुरळचे शिवसेना शाखाप्रमुख श्री.अरविंद जाधव,कडवई चे दत्ता ओकटे,कुचांबे गावचे गावकर मा. श्री .कृष्णा थेराडे , केंद्र प्रमुख श्री दीपक यादव, श्री दिंगबर सुर्वे, श्री जंगम,श्री महाडीक. विस्तार अधिकारी मा.सौ.खडसे मॅडम.कडवई विभाग आरोग्य सेविका डॉक्टर राजे मॅडम. ग्रामसेवक श्री.राजेशिर्के,माजी सरपंच रवींद्र काजवे, पत्रकार सचिन पाटोळे. पोलिस पाटील श्री.सुदर्शन कदम, श्री.शांताराम निकम, श्री.संदीप कदम,श्री.मेणे.तंटामुक्त समिती अध्यक्ष उदय थेराडे.केंद्र कुचांबे शिक्षक वर्ग श्री संतोष कदम,श्री संतोष सिंदे,श्री मितेश पळे,श्री अमर खोत,सौ.दरेकर मॅडम,सौ सान्वी टाकळे,श्री गौरी कळे.ग्रामस्थ,पालक,सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते.तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष सिंदे सर यांनी केले.व श्री संतोष कदम सरांनी आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×