सांगली:प्रतिनिधी
दि:२९:सांगलीत गेल्या काही काळापासून उष्णतेचा पारा वाढत आहे. तापमानामुळे सांगलीकर हैराण झाले आहेत.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
सांगलीत काल (28 मे) रोजी कमाल तापमान 38° सेल्सिअस तर किमान तापमान 23° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.
दरम्यान आज (29 मे) रोजी कमाल तापमान 38° सेल्सिअस तर किमान तापमान 24° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
आज (29 मे) आकाश पूर्णतः निरभ्र राहण्याची शक्यता देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तविली आहे.
नागरिकांनी शक्यतो दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे टाळावे. दिवसभर भरपूर पाणी प्यावे. तसेच आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.