संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन”
कोल्हापूर :प्रदीप मस्के
दि .१५ :‘जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त’ विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्ग केंद्र व राज्य शासन योजनातील प्रशिक्षण, कोर्सेस, कार्यशाळा, जाणीवजागृती, मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ जुलै २०२४ ते २० जुलै २४ संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग येथे करण्यात आले आहे. जागतिक युवा कौशल्य दिन २०२४ ची थीम “शांतता निर्माण, संघर्ष निराकरण आणि शाश्वत विकासाच्या प्रयत्नांमध्ये तरुण कसे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात” या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालकांना कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. अजय बी. कोंगे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन कार्यक्रमा मध्ये जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत मोफत आणि विद्यावेतनासह तांत्रिक अभ्यसक्रम (कोर्सेस) सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटर, फौंड्री टेक्नॉलॉजी, लेथ मसिन ऑपरेटर, तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोग सीबी कोरा संस्थान प्रोफेशनल ट्रेनिंग असोसिएट अंतर्गत प्रशिक्षण अल्प फी मधील कोर्सेस : कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, सोलार टीव्ही इन्स्टॉलर, ऑटोकॅड डिझाइनिंग सिविल, कटाई आणि विणकाम, सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटर. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्य : सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकता विकास कौशल्ये, जीवन कौशल्ये, इंग्रजी संप्रेषण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, संगणक-तंत्रज्ञान कौशल्य, आरोग्य आणि जागरूकता, नोकरी मुलाखत कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये, नवउद्योजकास शासकीय योजना प्रशिक्षण : नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी “महाराष्ट्र स्टार्टअप” योजना, “मुद्रा योजना”, “मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम”(CMEGP) योजना, “सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय.” योजना आणि प्रशिक्षण, “आत्मनिर्भर भारत” योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम (PMEGP) योजना, यासारख्या विविध शासकीय स्टार्टअप जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यशाळा. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार कोर्सेस, केद्र शासन आयोजित कौशल्य विकास योजना कोर्सेस आणि माहिती कौशल्य भारत, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया, मेक इन इंडिया माहिती व मार्गदर्शन, बार्टी उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रम, विविध बीज भांडवल महामंडळाची माहिती आणि मार्गदर्शन. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील वय १८ ते ४५ वयोगटातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूट मार्फत सर्वांना करण्यात येत आहे.
“जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त” विविध मार्गदर्शन कार्यक्रमचे आयोजन केल्याबद्दल, संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.