शरद इन्स्टिट्युटच्या २ विद्यार्थ्यांची एक्स्परेट कंपनीत निवड
यड्राव:सलीम माणगावे
दि . १५ यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील २ विद्यार्थ्यांची एक्स्परेट लि. या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील सोफिया समडोळे,स्वेता भोसले या विद्यार्थ्यांची निवड झाली.एक्स्परेट ही यूके आधारित सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे. ज्याची कार्यालये यूके आणि भारतात आहेत. कंपनी पूर्ण डिझाइन आणि डेव्हलपमेंट सेवेपासून ते अल्पकालीन प्रकल्पांपर्यंत सर्व काही ऑफर करते.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. प्रोजेक्ट बेस लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुस-या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो. तसेच तृतीय वर्षापासूनच अॅप्टीट्युड ट्रेनिंग, कोडींग लँग्वेज स्कील याचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षणासोबत भरपूर प्रात्यक्षिक करुन घेतल्याचा फायदा या कंपनीच्या इंटरव्ह्युवेळी झाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.