खेड कुणबी समाजाच्या अध्यक्षपदी आग्रे गुरुजी यांची निवड

खेड:प्रतिनिधी 
दि.१५ :कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई शाखा खेड ग्रामीण तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली असून सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कृष्णा पांडुरंग आग्रे यांची कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड (ग्रामीण) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदी सचिन गोवळकर यांची निवड करण्यात आली आहे.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड ग्रामीण कार्यकारीणी निवडीबाबतची सर्वसाधारण सभा दि. 9 डिसेंबर 2023 रोजी नवभारत हायस्कूल  सभागृह भरणे ता. खेड येथे आयोजीत करण्यात आली होती. हि सभा खेड मुंबईचे अध्यक्ष श्री.शंकर धोंडू बाईत, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेस तालुक्यातील 160 पेक्षा जास्त  सभासद उपस्थितीत होते.
शाखेच्या खजिनदार पदी म्हणून सुधिर सिताराम वैराग, सह खजिनदार संजय गणपत साळवी व खेड तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटाचे 7 अध्यक्ष व सेक्रेटरी यांची  निवड करण्यात आली आहे.
यावेळी रत्नागिरी  जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक पदी राजेंद्र चांदीवडे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक पदी रविंद्र हरावडे, यांची निवड झाल्याने तालुक्यातील समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
   आग्रे गुरुजी यांनी 38 वर्षे जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षक म्हणून  व 3 वर्षे तालुका मास्तर म्हणून काम पाहिले आहे. तसेच दापोली तालुक्यातील ओनवसे  गावी सातमाई देवी विद्यामंदिर प्रसारक संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहीले आहे. तसेच खेड तालुक्यातील कुणबी समाजाचे प्रश्न व अडचणी यांची त्यांना चांगली  जाण असून ते सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी खेड तालुक्यातील माजी आमदार तू .बा. कदम यांच्यासमवेत काम केलेले आहे. त्यांचा समाजामध्ये खूप चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा उपयोग  समाजाला दिशा देण्यासाठी  होणार आहे.
        ही कार्यकारीणी निवड सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमित कदम, सुरेश मांडवकर, जयवंत वामने,विष्णू निवाते, संदीप तांबट, निलेश आंबेडे,राजेश मेटकर, संदीप दोडेकर, प्रकाश गोठल, सर्व मुंबई व ग्रामीण कार्यकर्ते यांनी विशेष योगदान दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×